06 July 2020

News Flash

सावरकरांबाबत काँग्रेसच्या ट्विप्पणीने वाद

नथुराम गोडसे यांनी गांधीजींची हत्या केली आणि गोडसे हे सावरकरांच्या निकटचे होते.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या आठवडय़ात लोकसभेत भाषण करताना, गांधी आमचे आणि सावरकर तुमचे, असे वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडलेले असतानाच आता हा संघर्ष टिपेला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वातंत्र्यलढय़ात चंद्रशेखर आझाद प्राणांची आहुती देत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडे दयेची भीक मागत होते, असे काँग्रेसने ट्वीट केल्याने जोरदार संघर्ष पेटण्याची लक्षणे दिसत आहेत.

काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आझाद यांच्या छायाचित्रावर ‘असली’ आणि सावरकरांच्या छायाचित्रावर ‘नकली’ असे लिहिले आहे. आझाद अखेपर्यंत लढत असताना सावरकर यांनी ब्रिटिशांकडे सहा वेळा दयेची भीक मागितली, असेही म्हटले आहे. सावरकर यांना काँग्रेसचा विरोध आहे, त्यावरून हिंदुत्ववादी संघटना, पक्ष आणि काँग्रेसमध्ये वादाचा भडका उडणार आहे.

आमच्याकडे गांधी आहेत, तुमच्याकडे सावरकर आहेत, असे राहुल गांधी म्हणाले, तेव्हा भाजपच्या सदस्यांनी त्याचा लोकसभेत निषेध केला आणि दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली. तेव्हा, आपण गांधी आमचे आणि सावरकर तुमचे असे म्हणालो, त्यामध्ये काय चूक केली, सावरकर तुमचे नाहीत का, तुम्हाला त्यांचे विस्मरण झाले का, तसे असल्यास ते उत्तम आहे, असे आपण बोलल्याचे राहुल गांधी म्हणाले. तेव्हापासून काँग्रेसने ट्विटरवरून सावरकर यांना ‘नकली’ संबोधण्यास सुरुवात केली आणि त्यांचा गांधी हत्येशीही संबंध जोडला. महात्मा गांधीजींच्या हत्येमध्ये सावरकर यांचा सहभाग होता, असे सरदार पटेल यांनी म्हटल्याचे ट्वीट काँग्रेसने केले. मात्र हा आरोप सिद्ध करणारा एकही वैध पुरावा नाही. नथुराम गोडसे यांनी गांधीजींची हत्या केली आणि गोडसे हे सावरकरांच्या निकटचे होते.

आतापर्यंत काँग्रेसने हा संवेदनक्षम प्रश्न टाळला होता, महाराष्ट्रातील नेत्यांचे सावरकर यांच्याबद्दल दोन मतप्रवाह आहेत. सावरकर यांच्या देशभक्तीचा काँग्रेसला आदर आहे, मात्र हिंदू राष्ट्र स्थापित करण्याची त्यांची भूमिका काँग्रेसने फेटाळली आहे.

भाजपकडून माफीची मागणी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर सोमय्या यांनी लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडेही याबाबतची तक्रार केली आहे. सावरकर यांचा अपमान केल्याबद्दल गांधी यांनी माफी मागितलीच पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2016 4:31 am

Web Title: congress comments on savarkar
टॅग Congress
Next Stories
1 ..तर बाबा वाचले असते!
2 गृहमंत्र्यांकडून सुरक्षेचा आढावा
3 ब्रिटनच्या व्हिसा शुल्कवाढीचा हजारो भारतीयांना फटका
Just Now!
X