News Flash

Corona vaccine policy: संसदीय अधिवेशनाची काँग्रेसची मागणी

केंद्राने १८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्वांना लस उपलब्ध करुन देण्याच्या घोषणेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला

Corona vaccine policy: संसदीय अधिवेशनाची काँग्रेसची मागणी (photo pti)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राने १८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्वांना लस उपलब्ध करुन देण्याच्या घोषणेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. सरकारने यावेळी देशात दररोज ८० लाख डोस देण्यास प्राधान्य द्यावे आणि लोकांना खासगी रुग्णालयातही लस मोफत मिळायला हवी, अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश केली.  तसेच सरकार डेडलाइन आधारित नव्हे तर हेडलाईन आधारित काम करते, असा आरोप जयराम रमेश यांनी केला.

केंद्र हे “हेडलाईन आधारित सरकार” असल्याचा आरोप करीत पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी राज्यांना लसींचे वाटप करण्याचे निकष निश्चित करण्याचे आवाहन केले. खासगी रुग्णालयांकडून ‘कोविन’ नोंदणीची आवश्यकता दूर करण्याची आणि अतिरिक्त अर्थसंकल्पाची गरज भासल्यास संसदेचे अधिवेशन बोलवून परवानगी घेण्याची मागणी केली.

लसीकरणाला सरकारने प्राधान्य द्यावे

“मनमोहन सिंग, कॉंग्रेस, विरोधी पक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाच्या टीकेनंतर पंतप्रधानांनी मोफत लसीकरणाची घोषणा केल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. त्यांच्या घोषणेची ही पार्श्वभूमी आहे, परंतु पंतप्रधान नेमकी पार्श्वभूमी जनतेसमोर कधीच प्रकट करत नाहीत. पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेवर ५० हजार कोटी रुपये खर्च केले जातील. लसीकरणासाठी सरकारने ३५,००० कोटी रुपयांचे वाटप केले आहे. सेंट्रल व्हिस्टावर २० हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. सरकारी पैशांची कमतरता नाही, प्राथमिकतेची कमी आहे.” असे जयराम रमेश म्हणाले.

“जेव्हा ठाकरे-मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच”, संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया!

जयराम रमेश म्हणाले, “यावेळी फक्त लसीकरणाला प्राधान्य दिले पाहिजे. संसदेचे अधिवेशन बोलवा, समित्यांची बैठक बोलावा. लसीकरणासाठी अतिरिक्त अर्थसंकल्पाची परवानगी मिळवा. पंतप्रधान केंद्रामार्फत मोफत लसीकरण व लस खरेदी करण्याविषयी बोलले, परंतु 25 टक्के लस खासगी रुग्णालयांना देण्यात येतील, असेही ते म्हणाले. खासगी रुग्णालयांना कोणत्या किंमतीवर आणि कोणत्या आधारावर लसी दिली जातील हे सांगितले नाही”

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 6:39 pm

Web Title: congress demands parliament session to discuss covid vaccine policy srk 94
Next Stories
1 राम मंदिरासाठी निधी गोळा करण्यादरम्यान जातीय हिंसाचार; हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस
2 “इन्फोसिस करदात्यांचा भ्रमनिरास करणार नाही अशी अपेक्षा”, निर्मला सीतारमण यांनी सुनावलं!
3 Corona Vaccination : राज्यांना केंद्र सरकारचा इशारा, लस वाया घालवली तर..
Just Now!
X