01 October 2020

News Flash

पाकभेट ट्विटरवरून कळणे दुर्दैवी – काँग्रेस

पाकिस्तानला दिलेल्या आकस्मिक भेटीची माहिती मोदींनी ट्विटरवरून देणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे.

पाकिस्तान भेटीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दिल्लीत शुक्रवारी दहन केले.

पाकिस्तानला दिलेल्या आकस्मिक भेटीची माहिती मोदींनी ट्विटरवरून देणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. पाकिस्तान भेट हा मुद्दा गंभीर आहे. तिची अशा प्रकारे वाच्यता होणे नको होते, असे सांगत काँग्रेसने या भेटीवर प्रश्नचिन्ह लावले. पंतप्रधानांच्या भेटीची माहिती आम्हाला ट्विटरवरून कळते हे दुर्दैवी आहे. भारत व पाकिस्तानचे संबंध फारसे चांगले नसतानाही दुसऱ्या देशावरून परत येताना मोदी पाकिस्तानमध्ये थांबतातच कसे, असा सवाल प्रवक्ते अजयकुमार यांनी केला. अशा मुद्दय़ांवर मोदी कुणाला विश्वासात का घेत नाहीत, याबाबतही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 2:35 am

Web Title: congress frosted on india pakistan meeting
टॅग Congress
Next Stories
1 लाहोर भेटीने मोदींचे पुढचे पाऊल..
2 भारत-अफगाणिस्तान मैत्री काही देशांना खुपते
3 ‘यारी हैं इमान मेरा, यार मेरी जिंदगी..’
Just Now!
X