04 December 2020

News Flash

१७० कोटींच्या काळया पैशाच्या मुद्यावरुन आयकर खात्याने काँग्रेसला पाठवली नोटीस

काळया पैशांच्या मुद्यावरुन आयकर खात्याने काँग्रेसला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

काळया पैशांच्या मुद्यावरुन आयकर खात्याने काँग्रेसला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हैदराबादमधल्या कंपनीकडून पक्षाला मिळालेल्या काळया पैशाच्या निधीच्या मुद्यावर आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याबद्दल आयकर खात्याने ही नोटीस बजावली आहे.

वरिष्ठ काँग्रेस पदाधिकाऱ्यांनाही आयकर खात्याने समन्स बजावले आहे. अलीकडेच आयकर खात्याच्या एक छाप्यामध्ये हैदराबाद स्थित इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने काँग्रेसला हवाला मार्गाने १७० कोटी रुपये पाठवल्याचे समोर आले होते.

हैदराबादमधल्या या कंपनीने सरकारकडून मिळालेल्या बहुतांश प्रकल्पांमधून बनावट बिले बनवल्याचे आयकर खात्याच्या तपासातून समोर आले होते. तोच निधी काँग्रेसकडे वळल्याचा आयकर खात्याचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 4:14 pm

Web Title: congress gets i t show cause notice over alleged rs 170 cr black money dmp 82
Next Stories
1 “बलात्काऱ्यांना सहा महिन्यात फासावर लटकवा”, नरेंद्र मोदींना पत्र
2 शिर्डी एक्स्प्रेसचा डब्बा रुळावरून घसरला
3 गेल्या दहा वर्षात रेल्वेची स्थिती सर्वात वाईट; मंदीच्या वातावरणात मोदी सरकारला आणखी एक झटका
Just Now!
X