21 September 2020

News Flash

शेतकरी आत्महत्येचे लोकसभेत पडसाद, कामकाज तहकूब

राजधानी दिल्लीमध्ये 'आप'च्या सभेवेळी बुधवारी एका शेतकऱयाने आत्महत्या केल्याचे तीव्र पडसाद गुरुवारी संसदेमध्ये उमटले.

| April 23, 2015 11:43 am

राजधानी दिल्लीमध्ये ‘आप’च्या सभेवेळी बुधवारी एका शेतकऱयाने आत्महत्या केल्याचे तीव्र पडसाद गुरुवारी संसदेमध्ये उमटले. कॉंग्रेसने या विषयावरून प्रश्नोत्तराचा तास रद्द करून चर्चा करण्याची मागणी लोकसभेत केली. मात्र, अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी चर्चा करण्याची तयारी दर्शविताना प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याची मागणी फेटाळली. यामुळे कॉंग्रेस सदस्यांनी अध्यक्षासमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
राजस्थानमधील गजेंद्रसिंह या शेतकऱयाने बुधवारी दुपारी आपच्या सभेमध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याविषयावरून कालपासूनच राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या होत्या. गुरुवारी लोकसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच कॉंग्रेसच्या नेत्यांनी अध्यक्षांकडे स्थगन प्रस्तावाच्या नोटिसा दिल्या होत्या. कामकाज सुरू झाल्यावर संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी हा विषय गंभीर असून, सरकार त्यावर चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले. चर्चेनंतर गृहमंत्री राजनाथ सिंह त्याला उत्तर देतील, असेही त्यांनी सांगितले. मात्र, लोकसभा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करून चर्चा घेण्यास नकार देत १२ वाजता चर्चा घेण्यास मंजुरी दिली. कॉंग्रेसचे सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. मोदी सरकार होशमे आओ आणि जय किसानच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 11:43 am

Web Title: congress gives notice for adjournment motion in lok sabha on the issue of farmers suicide in delhi
टॅग Lok Sabha
Next Stories
1 शेतकरी आत्महत्येवरून राजकारण नको – राजनाथसिंह
2 ‘आप’च्या सभेत शेतकऱ्याची आत्महत्या
3 ‘नेट न्यूट्रॅलिटी’वरून राहुल गांधींची सरकावर टीका
Just Now!
X