News Flash

‘काँग्रेसकडे चेहराच नाही, त्यामुळे आता चॉकलेट चेहरे समोर आणले जात आहेत’

प्रियंका गांधी यांच्या राजकारणातल्या एंट्रीवर भाजपा नेत्याने टीका केली आहे

काँग्रेसकडे चेहराच नाही त्यामुळे आता चॉकलेट चेहरे समोर आणले जात आहेत. कधी सलमान खान काँग्रेसकडून लढणार असे सांगितले जाते आहे, कधी करीना कपूरची चर्चा होते तर कधी प्रियंका गांधीना राजकारणात आणले जाते आहे अशी टीका भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियंका गांधी यांचा राजकारणात प्रवेश केला. त्या इतके दिवस राजकारणात सक्रिय नव्हत्या त्या आता सक्रिय झाल्या आहेत. प्रियंका गांधी म्हणजे आमचा हुकमी एक्का आहे असे काँग्रेसने म्हटलं आहे. अशात कैलाश विजयवर्गीय यांनी मात्र त्यांना चॉकलेट चेहरा म्हटले आहे.

तसेच लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सलमान खान आणि करीना कपूर या सिनेसृष्टीतील कलाकारांना काँग्रेसकडून तिकिट दिलं जाईल आणि हे दोन कलाकार निवडणूक लढवू शकतात अशी शक्यताही वर्तवण्यात आली होती. या सगळ्यावर आता भाजपाकडून टीका करण्यात येते आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी हाच मुद्दा उपस्थित करत काँग्रेसकडे चेहरा उरलेला नाही त्यामुळेच आता चॉकलेट चेहरे समोर आणले जात आहेत अशी टीका केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 10:21 pm

Web Title: congress has no face so now chocolate faces are being brought in front says kailash vijayvargiya
Next Stories
1 …तर राम मंदिराचा प्रश्न चोवीस तासात निकाली काढू-योगी आदित्यनाथ
2 राहुल गांधी आणि नितीन गडकरींमध्ये गप्पा, मग चर्चा तर होणारच!
3 काँग्रेसच्या मंत्र्याला वाचता येईना, जिल्हाधिकाऱ्यांना दिला भाषण वाचण्याचा आदेश
Just Now!
X