12 December 2017

News Flash

तेलंगणची स्थापना करण्यास काँग्रेसचा विरोध नाही -पी. सी. चाको

स्वतंत्र तेलंगण राज्याच्या निर्मितीसाठी वाढता दबाव असतानाच या प्रलंबित मुद्दय़ावर तोडगा काढून राज्याच्या निर्मितीचा

पीटीआय, नवी दिल्ली | Updated: January 30, 2013 8:02 AM

स्वतंत्र तेलंगण राज्याच्या निर्मितीसाठी वाढता दबाव असतानाच या प्रलंबित मुद्दय़ावर तोडगा काढून राज्याच्या निर्मितीचा निर्णय जलद गतीने घेतला जाईल, असे काँग्रेसने बुधवारी येथे स्पष्ट केले.
तेलंगण राज्याची निर्मिती करण्यास काँग्रेसचा विरोध नाही. या मुद्दय़ावरील निर्णयाची प्रक्रिया सुरू आहे. परंतु यासंबंधी काही औपचारिक बाबींची पूर्तता अद्याप बाकी आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते पी. सी. चाको यांनी पत्रकारांना सांगितले.
स्वतंत्र तेलंगण राज्याची लवकरात लवकर निर्मिती करण्याची मागणी रेटून नेण्यासंदर्भात आपले राजीनामे देण्यासाठी तेलंगणातील काँग्रेसच्या खासदारांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट मागितली आहे. त्यासंदर्भात चाको बोलत होते. तेलंगणाच्या मुद्दय़ावर काँग्रेसची भूमिका सर्वज्ञात आहे परंतु काही काळाचा हा प्रश्न आहे, असे चाको यांनी सूचित केले.

First Published on January 30, 2013 8:02 am

Web Title: congress has no problem on telangana foundation pc chacko