News Flash

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

रुटीन चेकअपसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सुत्रांकडून कळते. दरम्यान, त्यांच्यासोबत प्रियंका गांधी-वढेरा आणि राहुल गांधी देखील आहेत. 

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुटीन चेकअपसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सुत्रांकडून कळते. दरम्यान, त्यांच्यासोबत प्रियंका गांधी-वढेरा आणि राहुल गांधी देखील आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे अनेक बडे नेतेही रुग्णालयात पोहोचत आहेत. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.


७३ वर्षीय सोनिया गांधी गेल्या काही वर्षांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे अधुनमधून रुग्णालयात दाखल होत असतात. आत्ताही त्या नेहमीच्या तपासणीसाठीच रुग्णालयात दाखल झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकारणातला त्यांचा वावरही आता पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे. निवडणूक प्राचारामध्येही त्या कमी प्रमाणात सहभागी होत आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मोठ्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा पक्षाच्या प्रमुखपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागली. सर्वात मोठ्या काळासाठी काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 8:04 pm

Web Title: congress interim president sonia gandhi admitted to sir ganga ram hospital in delhi aau 85
Next Stories
1 निर्भयाच्या दोषींना एक-एक करुन फाशी द्यायला हरकत नाही; सरकारने कोर्टात मांडली बाजू
2 चीनमध्ये अडकलेले पाकिस्तानी विद्यार्थी संतापले; इम्रान खान यांना भारताकडून शिकण्याचा दिला सल्ला
3 Delhi Election: काँग्रेस देणार बेरोजगार भत्ता; भाजपाकडून विद्यार्थीनींना इलेक्ट्रिक स्कूटर
Just Now!
X