26 January 2020

News Flash

अभिनंदन सोनियांचे पण चर्चा मात्र वढेरांची

पक्षाच्या मुख्यालयाबाहेर सोनिया गांधी यांच्या अभिनंदनाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

फोटो सौजन्य: एएनआय

लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर त्याची जबाबदारी स्वीकारात राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर जवळपास अडीच महिने पक्षाचे अध्यक्षपद रिकामे होते. काही दिवसापूर्वीच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीनंतर काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी त्यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग्स लावले आहेत. या फलकांवर रॉबर्ट वढेरा यांचा फोटोदेखील छापण्यात आला आहे.

पक्षाच्या मुख्यालयाबाहेर सोनिया गांधी यांच्या अभिनंदनासाठी लावण्यात आलेल्या होर्डिंग्सवर राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याव्यतिरिक्त रॉबर्ट वढेरा यांचा फोटोही छापण्यात आला आहे. सोनिया गांधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन असा संदेशही यावर छापण्यात आला आहे.

यापूर्वीही काँग्रेसच्या पोस्टर्स आणि होर्डिंग्सवर रॉबर्ट वढेरा यांचे फोटो छापण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे रॉबर्ट वढेरा यांचे पोस्टर्स लावण्यात आले होते. तसेच मुरादाबादच्या जागेवरून निवडणूक लढवण्यास तुमचे स्वागत आहे, असे त्यावर नमूद करण्यात आले होते.

First Published on August 14, 2019 12:17 pm

Web Title: congress interim president sonia gandhi banners out side office robert vadra on poster jud 87
Next Stories
1 सध्याच्या स्थितीत कौरव कोण, पांडव कोण? – ओवेसी
2 मोदींना राखी बांधण्यासाठी पाकिस्तानी महिला दिल्लीत, म्हणाली ‘मोदींचा अभिमान वाटतो’
3 विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र
Just Now!
X