28 November 2020

News Flash

काँग्रेस म्हणजे बुडते जहाज, गुजरात पोटनिवडणुकांचा निकाल म्हणजे ट्रेलर – विजय रुपाणी

त्यांनी लोकांशी संपर्क गमावला आहे. सर्वत्र त्यांच्या विरोधात निकाल आहेत, असं देखील म्हणाले आहेत

संग्रहीत

काँग्रेस हे बुडते जहाज आहे, त्यांनी लोकांशी संपर्क गमावला आहे. सर्वत्र त्यांच्या विरोधात निकाल आहेत. हा नेतृत्व नसलेला पक्ष आहे. गुजरातमधील पोट निवडणुकांचे निकाल हे आगामी काळातील निवडणुकांचा ट्रेलर आहे. असं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी म्हटले आहे.

गुजरातमधील पोटनिवडणुकीत सर्व आठ जागांवर भाजपा विजयी आघाडीवर आहे. तर, आगामी पंचायत निवडणुका व २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा उत्कृष्ट प्रदर्शन करेल, असा विश्वासही रुपाणी यांनी व्यक्त केला आहे. तसेच, काँग्रेस समाजात अफवा पसरवून निवडणुकीत फायदा घेण्याचा प्रयत्न करते. मात्र गुजरातच्या जनतेने त्यांना यशस्वी होऊ दिलं नाही. असं देखील मुख्यमंत्री रुपाणी यांनी सांगितलं.

आणखी वाचा- “राहुल गांधींनी ज्यांच्यासोबत हात मिळवला ते डुबले”

तर, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी म्हटले की, जनतेने सरकारच्या कामावर विश्वास दाखवत, पोटनिवडणुकीत सर्व आठ जागांवर विजयी होण्यासाठी कौल दिला  आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच भाजपाचा विजय निश्चित झालेला होता. गुजरातमध्ये काँग्रेसचे अस्तित्व संकटात आहे. काँग्रेस नेते चुकीची वक्तव्य करून सरकार व भाजपा नेत्यांना बदनामा करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होते. . केंद्रातील मोदी सरकार व गुजरातमधील रुपाणी सरकार जनेच्या हितासाठी काम करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 3:07 pm

Web Title: congress is a sinking ship vijay rupani msr 87
Next Stories
1 समजून घ्या: बिहार निवडणुकीचा निकाल येण्यासाठी रात्र उजाडणार; हे आहे कारण
2 “पृथ्वीवरुन चांद्रयान नियंत्रित होतं, मग ईव्हीएम हॅक होणं शक्य नाही का?”
3 बिहार निवडणुकीतला चर्चित चेहरा पुष्पम प्रिया चौधरी दोन्ही मतदारसंघातून पिछाडीवर
Just Now!
X