News Flash

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आयसीयूत दाखल

अहमद पटेल यांना ऑक्टोबर महिन्यात करोनाची लागण झाली होती

संग्रहित

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना करोनाची लागण झाली असून प्रकृती बिघडली आहे. अहमद पटेल यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गुडगावमधील मेदांता रुग्णालयात अहमद पटेल यांना पुढील उपचारासाठी गुडगावमधील मेंदाता रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आयसीयूत ठेवण्यात आलं असल्याची माहिती कुटुंबाने दिली आहे.

७१ वर्षीय अहमद पटेल यांनी १ ऑक्टोबर रोजी आपल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. अहमद पटेल यांचा मुलगा फैसल यांनी ट्विट केलं असून दिलेल्या माहितीनुसार, “अहमद पटेल यांना काही आठवड्यांपूर्वी करोनाची लागण झाली होती. सध्या त्यांना पुढील उपचारासाठी गुडगामधील मेदांता रुग्णालयातील आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे”.

“सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. ते लवकर बरे व्हावेत यासाठी आपण प्रार्थना करावी अशी आमची विनंती आहे,” असंही फैसल यांनी म्हटलं आहे. अहमद पटेल यांच्यासाठी अनेक काँग्रेस नेत्यांनी ट्विट केलं असून लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 4:46 pm

Web Title: congress leader ahmed patel in icu sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 चीनमध्ये आयात गोमांस, कोळंबीच्या पार्सलवर आढळले करोनाचे विषाणू
2 “माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती,” नितीश कुमार यांचं मोठं वक्तव्य
3 संपूर्ण हिंदुस्थानात ‘एमआयएम’ आपला झेंडा फडकवत असल्याचं जग पाहील – अकबरुद्दीन ओवेसी
Just Now!
X