20 September 2018

News Flash

नर्मदा परिक्रमेनंतर पकोडे तळणार नाही, दिग्विजय सिंह यांचा मोदींना टोला

२२०० किमी हून अधिक पायी प्रवास केला आहे.

दिग्विजय सिंह

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी आपली नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. त्यानंतर जबलपूर येथे आलेल्या दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान मोदींच्या बेरोजगारांनी पकोडे तळण्याच्या वक्तव्यावर भाष्य केले. मी राजकारणी आहे, आणि या धार्मिक यात्रेनंतर मी काही पकोडे तळणार नसल्याचा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता लगावला.

HOT DEALS
  • Samsung Galaxy J3 Pro 16GB Gold
    ₹ 7490 MRP ₹ 8800 -15%
  • Honor 9 Lite 64GB Glacier Grey
    ₹ 16999 MRP ₹ 17999 -6%
    ₹2000 Cashback

मध्य प्रदेशमध्ये यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. ही निवडणूक दिग्विजय सिंह यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी खूप महत्वाची आणि वेगळे वळण घेणारी ठरणार आहे. दिग्विजय सिंह यांचे सहकारी महेश जोशींच्या मते, विधानसभा निवडणुकीत दिग्विजय यांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. या परिक्रमेनंतर दिग्वियज सिंह हे आणखी एका दुसऱ्या यात्रेची तयारी करत असल्याचेही जोशी यांनी सांगितले. नर्मदा परिक्रमेत दिग्विजय सिंह यांनी तब्बल २२०० किमी हून अधिक पायी प्रवास केला आहे.

दरम्यान, मागील १५ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने पुरता जोर लावलेला आहे. काँग्रेसचे युवक नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह यांच्यावर निवडणुकीत विजय मिळवण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. परंतु, दिग्विजय सिंह यांनी यापूर्वी आपण निवडणूक लढवणार नसून मुख्यमंत्री होण्याची इच्छाही नसल्योच म्हटले होते. विधानसभा निवडणुकीत कोणालाही तिकीट मिळो किंवा कोणीही निवडणूक लढो, मला त्याच्याशी काही देणेघेणे नाही, असे ते म्हणाले होते.

First Published on February 14, 2018 1:34 pm

Web Title: congress leader digvijay singh criticized on pm modi on pakoda after narmada parikrama