वादग्रस्त विधाने करून अनेकदा टीकेचे धनी ठरलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अर्वाच्च भाषेचा वापर केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मोदींच्या समर्थकांना कथितरित्या ‘भक्त’ म्हणून संबोधले आहे. तसेच मोदी आणि समर्थकांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली आहे.

दिग्विजय सिंह यांनी केलेल्या ट्विटमध्ये मोदींच्या फोटोसह तीन ओळी आहेत. त्यात ”मेरी 2 उपलब्धिया:1. भक्तों को चु**** बनाया 2. चु**** को भक्त बनाया!” असा उल्लेख केला आहे. त्यानंतर हे माझे ट्विट नाही, पण ते शेअर करण्यापासून मी स्वतःला थांबवू शकलो नाही, असे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे ‘मीम’ तयार करणाऱ्या व्यक्तीची माफीही मागितली आहे. सिंहांच्या या आक्षेपार्ह ट्विटमुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.