काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी ईडीने अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने अटक केली आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेनंतर काँग्रेसमधले दिग्गज नेते डी. के. शिवकुमार यांनाही ईडीने समन्स बजावले होते. गेल्याच वर्षी ईडीने शिवकुमार यांच्याविरोधात मनी लाँड्रिगचे प्रकरण दाखल केले होते. याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कथित कर चोरी, हवाला यांच्या आधारे शिवकुमार यांच्या विरोधात काही प्रकरणं दाखल करण्यात आली आहेत. आता ईडीने डी. के शिवकुमार यांना अटक केली आहे.

यापूर्वीही २०१७ मध्ये डी. के. शिवकुमार यांच्या ६४ ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. दरम्यान या छाप्यांचा आणि मनी लाँड्रींग प्रकरणाशी संबंध नाही असेही शिवकुमार यांनी म्हटले होते. दरम्यान शुक्रवारी म्हणजेच ३० ऑगस्टला त्यांना ईडीने समन्स बजावले होते. आता ईडीने त्यांना अटक केली आहे.

ईडीने नोव्हेंबर 2018 मध्ये शिवकुमार यांना नोटीस बजावली होती. परंतु शिवकुमार यांनी चौकशीसाठी हजर न राहण्याची सुट मागितली होती. परंतु त्यांना ईडीकडून दिलासा मिळाला नव्हता. त्यानंतर त्यांनी याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात या विरोधात याचिका दाखल केली होती. परंतु गुरूवारी त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली होती. आता त्यांना ईडीने अटक केली आहे.