25 October 2020

News Flash

राज्यसभेच्या कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार, खासदारांचं निलंबन रद्द करण्याची मागणी

व्यंकय्या नायडूंची फेरविचार करण्याची विनंती

राज्यसभेत गोंधळ घातल्याने आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत निलंबन मागे घेतलं जात नाही तोपर्यंत राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सभागृहात बोलताना ही माहिती दिली. दरम्यान सभापती व्यंकय्या नायडू यांनी विरोधी पक्षांना आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली आहे.

राज्यसभेत कृषी विधेयकांवरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांकडून वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी करण्यात आली. नियम पुस्तिका फाडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. यानंतर कारवाई करत आठ खासदारांचं निलंबन करण्यात आला. निलंबन करण्यात आलेल्या खासदारांमध्ये तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, डोला सेन, काँग्रेसचे राजीव सातव, रिपन बोरा, नझीर हुसेन, माकपचे के. के. रागेश, इलामारन करीम आणि आपचे संजय सिंह यांचा समावेश आहे. कारवाईविरोधात खासदारांकडून रात्रभर संसद परिसरात आंदोलन करण्यात आला.

आणखी वाचा- राज्यसभेतील गोंधळामुळे उपसभापती हरिवंश यांचा एकदिवसीय उपोषणाचा निर्णय

शून्य प्रहरमध्ये बोलताना गुलाम नबी आझाद यांनी आपल्या तीन मागण्या सभागृहात मांडल्या. यामध्ये खासदारांचं निलंबन मागे घेण्याचीही मागणी कऱण्यात आली. संसदेत अजून एक विधेयक आणलं जावं ज्यामध्ये कोणतीही खासगी व्यक्ती मुलभूत आधार किंमतीपेक्षा (MSP) कमी किंमतीत खरेदी करु शकत नाही तसंच स्वामीनाथन आय़ोगाच्या शिफारशींप्रणाणे मुलभूत आधार किंमत ठरवली जावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

आणखी वाचा- आठ निलंबित खासदारांचं संसद परिसरात रात्रभर धरणे आंदोलन

राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी विरोधी पक्षांना आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली आहे. “खासदारांचं निलंबन झाल्याने मला आनंद झालेला नाही. त्यांच्या वागणुकीमुळे ही कारवाई करण्यात आली. आम्ही कोणत्याही सदस्याविरोधात नाही,” असं व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- आंदोलक खासदारांना स्वतः चहा दिल्याबद्दल उपसभापती हरिवंश यांचे मोदींकडून कौतुक, म्हणाले…

दरम्यान रात्रभर संसदेत आंदोलन करणाऱ्या खासदारांसाठी उपसभापती हरिवंश चहा घेऊन पोहोचले होते. यावेळी त्यांनी स्वत: खासदारांना चहा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल हरिवंश यांचं कौतुक केलं. विरोधकांनी मात्र त्यांच्या या रणनीतीवर टीका केली असून ते शेतकरी विरोधी असल्याचं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 11:00 am

Web Title: congress leader ghulam nabi azad declared will boycott rajya sabha till mps suspension revoked sgy 87
Next Stories
1 लडाख सीमावाद: भारत-चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये तब्बल १३ तासाची मॅरेथॉन बैठक
2 आणखीन एक बँक घोटाळा : आइस्क्रीम बनवणाऱ्या कंपनीने नऊ बँकांना घातला १४०० कोटींचा गंडा
3 खासदार नुसरत जहाँ यांनी मागितली पोलिसांची मदत, जाणून घ्या कारण
Just Now!
X