News Flash

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना दुसऱ्यांदा जम्मू विमानतळावरुनच दिल्लीला पाठवलं

काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना मंगळवारी दुपारी दुसऱ्यांदा जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना मंगळवारी दुपारी दुसऱ्यांदा जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. जम्मू विमानतळावर उतरताच आझाद यांना ताब्यात घेण्यात आले. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करुन राज्याचे दोन भागांमध्ये विभाजन केल्यानंतर आझाद यांनी दुसऱ्यांदा राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते असणारे गुलाम नबी आझाद यांना याआधी आठ ऑगस्टला श्रीनगर विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी सुद्धा त्यांना विमानतळावरुन माघारी पाठवून देण्यात आले होते. २.५५ च्या सुमारास जम्मू विमानतळावर उतरल्यानंतर आझाद यांना ताब्यात घेतले व परत दिल्लीला पाठवून दिले. जम्मू प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आझाद जम्मूमध्ये आले होते.

गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रीपदही भूषवले आहे. कलम ३७० रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला गुलाम नबी आझाद यांचा विरोध असून संसदेत त्यांनी यावरुन सरकारवर जोरदार टीका केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 5:34 pm

Web Title: congress leader ghulam nabi azad from jammu airport sent back to delhi dmp 82
Next Stories
1 पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच, एक जवान शहीद
2 जम्मू-काश्मीरमधील नेत्यांच्या सुटकेसाठी विरोधकांचे दिल्लीत निषेध आंदोलन
3 “इतक्या जुन्या गाडया कोणीही चालवत नाही”, मिग-२१ विमानांवर एअर फोर्स प्रमुखांची खंत
Just Now!
X