काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी होम क्वारंटाइन आहे. मागील काही दिवसांमध्ये जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी त्यांची करोना चाचणी करावी. तसेच सरकारी नियमांचे पालन करावे” असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

गुलाम नबी आझाद यांच्या आधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल बोरा, अभिषेक मनु सिंघवी, तरुण गोगोई आणि आरपीएन सिंग यांच्यासह इतर काही काँग्रेस नेत्यांना करोना संसर्ग झाला आहे आणि ते यातून बरेही झाले आहेत. पंजाबचे आरोग्य मंत्री बलबीर सिंह सिद्धू यांना ६ ऑक्टोबर रोजी करोनाची बाधा झाली होती. त्यांनी राहुल गांधींसोबत एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. दरम्यान आज दहा दिवसांनी गुलाम नबी आझाद यांनाही करोनाची लागण झाली आहे अशी माहिती समोर आली आहे. गुलाम नबी आझाद यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे. तसंच जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी आणि सरकारी नियमांचे पालन करावे असंही आझाद यांनी स्पष्ट केलं आहे.