काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. पश्चिम बंगाल विधानसभेत काँग्रेस एकही जागा मिळवू न शकल्याने त्यांनी खडे बोल सुनावले आहेत. आसाम आणि केरळमध्येही पक्षाची कामगिरी निराशाजनक असल्याचं त्यांनी सांगितलं. पुद्दुचेरीसुद्धा काँग्रेसच्या हातून गेल्यानं त्यानं पक्षाला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. कपिल सिब्बल यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असल्ची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

‘पाच विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी निराशाजनक आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस एकही जागा जिंकू शकली नाही. आसाम आणि केरळमध्ये कामगिरी वाईट होती. काँग्रेसच्या हातातून पुद्दुचेरीही गेलं. आता पक्षातून आवाज उचलला जात आहे. तर याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पाच राज्यातील निवडणुकांवर अधिक भाष्य करणार नाही. योग्य वेळ आल्यावर यावर बोलेन. करोना काळात सर्वांना एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे’, असं काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी सांगितलं.

साताऱ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर दगडफेक; मराठा आरक्षण प्रकरणाचे पडसाद

करोना स्थितीवरून कपिल सिब्बल यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही टीका केली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले पाहीजे आपण करोनाची लढाई एकत्र लढली पाहीजे. निवडणुका वेगळी बाब आहे. मात्र इथे जीवन मृत्यूचा संघर्ष आहे’, असं सांगत पंतप्रधान करोना स्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचं सांगितलं.

“भारतात IPL भरवण्यात आम्ही कोणतीही चूक केलेली नाही”, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचं टीकाकारांना उत्तर!

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात काँग्रेसमधील जी २३ गटात सहभागी असलेल्या कपिल सिब्बल यांनी सोनिया गांधी यांन एक पत्र लिहीलं होतं. काँग्रेसच्या बैठकीमध्ये तत्काळ निर्णय घेण्याची आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याची मागणी केली होती.

दरम्यान देशातील करोनाची विदारक स्थिती पाहता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेस खासदारांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत करोनास्थितीबाबत चर्चा करण्यात येणार आहे.