01 March 2021

News Flash

मोदींवर टीका केल्याने काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गेंना धमकी

"तुम्ही मोदींवर टीका का करत आहात?"

संग्रहित (PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने आपल्याला धमकी मिळाल्याचा आरोप काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान शेतकरी आंदोलनावरुन सुरु असलेल्या टीकेला उत्तर देत पहिल्यांदाच भाष्य केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधत टोला लगावला. मल्लिकार्जून खर्गे यांनी यानंतर पत्रकार परिषद घेत मोदींवर टीका केली. त्यानंतर ही धमकी मिळाली असा आरोप त्यांनी केला आहे. इंडिया टुडेने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

काँग्रेस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन करणारी व्यक्ती पंतप्रधान मोदींवर टीका केल्याने मल्लिकार्जून खर्गे यांच्यावर संतापली होती. मल्लिकार्जून खर्गे यांनी मोदींच्या राज्यसभेतील भाषणानंतर विजय चौक येथे पत्रकार परिषद घेत टीका केली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन करणारी व्यक्ती वारंवार तुम्ही मोदींवर टीका का करत आहात? अशी विचारणा करत होते.

“तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की जे मनमोहन सिंग बोलले होते ते मोदीला करावं लागत आहे”; मोदींचा काँग्रेसचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना करोनापासून ते केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांबद्दल अनेक गोष्टींवर भाष्य केलं. सध्या देशभरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये सुरु असणारी शेतकरी आंदोलने, तसेच दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील दोन महिन्यांहून अधिक काळापासून सुरु असणारं शेतकरी आंदोलन या पार्श्वभूमीवर मोदींनी विरोधकांकडून होत असणाऱ्या टीकेचाही समाचार आपल्या भाषणात घेतला. यावेळी नव्या कृषी कायद्यांमधील तरतुदींबद्दल आक्षेप घेणाऱ्या आणि अनेक ठिकाणी आंदोलनांमध्ये सहभागी होणाऱ्या काँग्रेसलाही मोदींनी सुनावलं. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला.

कृषी कायद्यासंदर्भातील भूमिका काँग्रेसने बदलली असून त्यांनी यू-टर्न घेतला आहे असं मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलं. तसंच काँग्रेस आंदोलनामध्ये सहभागी होत आहे याबद्दल काहीही आक्षेप नसला तरी त्यांनी शेतकऱ्यांनाही मागील अनेक वर्षांपासून असणारी यंत्रणा आता बदलण्याची गरज आहे हेही सांगणं महत्वाचं होतं, असंही मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं.

करोनाविरुद्धची लढाई जिकंण्याचं श्रेय कोणत्याही सरकारला किंवा व्यक्तीला जात नसलं तरी…; पंतप्रधान मोदी

पुढे बोलताना कृषी धोरणांसंदर्भात यू-टर्न घेणाऱ्यांसाठी आपण मनमोहन सिंग यांचं एक जुनं वक्तव्य वाचून दाखवत असल्याचं सांगत पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंग यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ दिला. यामध्ये मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांना त्यांचा माल विकण्याचा अधिकार नसल्याचं नमूद केलं होतं. मात्र शेतकऱ्यांना हा अधिकार मिळायला हवा तसंच कृषी बाजारपेठा अधिक खुल्या करण्याची गरज मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली होती. कृषी बाजारपेठांना परावलंबी बनवणारी व्यवस्था बदलण्याचा आमचा उद्देश आहे असंही मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं, असा दाखला मोदींनी दिला. १९३० पासून असणाऱ्या कृषी मालविक्रीसंदर्भातील यंत्रणा नव्याने उभारण्याची गरज असल्याचे सांगताना मनमोहन सिंग यांनी म्हटल्याचंही मोदींनी सांगितलं.

राष्ट्रपतींचं भाषण न ऐकूनही अनेकजण बरचं काही बोलले; मोदींचा विरोधकांना चिमटा

यावरुनच पुढे मोदींनी, “काँग्रेस माझं ऐकणार नाही किमान मनमोहन सिंग यांचं तर ऐकेल” असं म्हणत टोला लगावला. “आम्ही कृषी क्षेत्रात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आहो उलट तुम्हाला (काँग्रेसला) अभिमान वाटला पाहिजे की जे मनमोहन सिंग बोलले होते ते मोदीला करावं लागत आहे असं तुम्ही म्हटलं पाहिजे,” असं म्हणतं मोदींनी काँग्रेसला सुनावलं. मोदींच्या या वक्तव्यानंतर भाजपा खासदारांनी टेबल वाजवून मोदींच्या या वक्तव्याचं समर्थन केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन कृषी कायद्यांमधील मूळ मुद्द्याबद्दल कोणी बोलत नसल्याचंही सांगितलं. कृषी कायद्याचा जो मूळ गाभा आहे त्याबद्दल कोणी बोलत नसून घाई घाईत कायदा संमत करण्यात आला वगैरे विषयांवर बोललं जात आहे. आहो, एवढं मोठं आपलं कुटुंब आहे तर थोडा गोंधळ होणारच. लग्नाच्या कार्यात नाही का एखादा पाहुणा पाहुणचार मिळाला नाही म्हणून नाराज होतो, तसाच प्रकार आहे हा. एवढं मोठं आपलं कुटुंब आहे तर थोडंफार असं होणार, असं म्हणत मोदींनी या कायद्याच्या मूळ मुद्द्यांवर चर्चा करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 8:09 pm

Web Title: congress leader mallikarjun kharge gets threat call sgy 87
Next Stories
1 इस्रो शोधणार उत्तराखंडमधील प्रलयाचं नेमकं कारण; २०० लोक अद्यापही बेपत्ता
2 पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ शब्दावर अशोक चव्हाणांनी नोंदवला आक्षेप, म्हणाले…
3 गाडीची कागदपत्रं मागणाऱ्या पोलिसाला तरुणांकडून बेदम मारहाण; मुलांना घरातून उचलून नेण्याची दिली धमकी
Just Now!
X