05 August 2020

News Flash

अब देखे किसका हात मजबूत है, हमारा या उस कातिल का? : मणी शंकर अय्यर

सीएए व एनआरसी विरोधात शाहीन बाग येथे आंदोलन करणाऱ्यांची घेतली भेट

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व  राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी)  विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे काही दिवसांपासून तीव्र निदर्शनं सुरू आहेत. येथील लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वचजण या कायद्याच्या विरोधातील आंदोलनात सहभागी झालेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेते मणी शंकर अय्यर यांनी काल आंदोनलस्थळी भेट दिली.

यावेळी त्यांनी, मी जे काही करू शकतो ते करण्यास मी तयार आहे. तसेच, जे काही बलिदान द्यायचे असेल, त्यामध्ये देखील सहभागी होण्यास मी तयार असल्याचे  सांगितले. तसेच, “अब देखे किसका हात मजबूत है, हमारा या उस कातिल का?” असं म्हणत अप्रत्यक्षरित्या सरकारला इशाराही दिला.

केंद्र सरकारवर थेट टीका करताना मणी शंकर अय्यर म्हणाले की, ‘सबका साथ सबका विकास’ असे वचन देऊन ते सत्तेत आले, परंतु त्यांनी ‘सबका साथ सबका विनाश’ केला. तसेच,  तुम्हीच त्यांना पंतप्रधा केले आहे, तुम्हीच त्यांना सिंहासनावरून उतरवू शकता, असे देखील अय्यर यावेळी उपस्थितांना उद्देशून म्हणाले. या अगोदर मणी शंकर अय्यर हे २०१७ च्या गुजरातमधील निवडणुका अगोदर पंतप्रधान मोदींना ‘नीच आदमी’ असे संबोधल्याने वादात सापडले होते. त्यांना या विधानाबद्दल माफी देखील मागावी लागली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 12:44 pm

Web Title: congress leader mani shankar aiyar at the protest against caa nrc in delhis shaheen bagh msr 87
Next Stories
1 कुठल्याही युद्धासाठी भारतीय लष्कर सज्ज – लष्करप्रमुख नरवणे
2 “ममता बॅनर्जी यांच्यावर राक्षसी संस्कार”, भाजपा आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
3 “अर्जुनाच्या बाणामध्ये आण्विक शक्ती होती”; राज्यपालांचा दावा
Just Now!
X