News Flash

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी कार्ती चिदंबरम यांना सीबीआयकडून अटक

चेन्नईतील विमानतळावरुनच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कार्ती चिदंबरम. (संग्रहित)

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सीबीआयने बुधवारी सकाळी ताब्यात घेतले. चेन्नईतील विमानतळावरुनच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला २००७ मध्ये नियमापेक्षा अधिक परकीय गुंतवणूक मिळाल्यानंतर ते कायद्याच्या कचाट्यात सापडू नये यासाठी कार्ती चिदंबरम यांनी वडील पी. चिदंबरम यांच्या मदतीने नियम वाकवल्याचा आरोप केला जात होता. या प्रकरणी सीबीआयने मे २०१७ मध्ये गुन्हा दाखल केला होता. पी. चिदंबरम केंद्रात मंत्री असताना नियमबाह्य परकीय गुंतवणूक केलेल्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला कार्ती यांनी मदत केली आणि त्या मोबदल्यात स्वतःच्या बेनामी कंपन्यांमार्फत कोट्यवधी रुपयांचा लाभ घेतल्याचा आरोप होता.

गुन्हेगारी स्वरुपाची फसवणूक करणे, बेकायदा पद्धतीने लाभ घेणे, सरकार अधिकाऱ्यांवरील प्रभावाचा गैरफायदा घेणे या कलमांखाली सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या प्रकरणी कार्ती चिदंबरम यांच्या घरावर छापा देखील टाकला होता. बुधवारी सकाळी कार्ती चिदंबरम लंडनमधून परतताच चेन्नई विमानतळावरुन सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वीच कार्ती चिदंबरम यांच्या सीएलाही सीबीआयने अटक केली होती.

कार्ती चिदंबरम यांच्यावरील कारवाईने मोदी सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. मोदी सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 9:22 am

Web Title: congress leader p chidambaram son karti detained by cbi at chennai airport in inx media money laundering case
Next Stories
1 भारतातील बॉम्बस्फोटांचा सूत्रधार अबू रशिद सीरियात ठार
2 अरविंद केजरीवाल भ्रष्ट, उपोषणास बोलावणार नाही: अण्णा हजारे
3 ‘हमको किनारा मिल गया है जिंदगी…!’
Just Now!
X