News Flash

“जेव्हा जेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या तेव्हा भाजपाचे स्वत:च्या सुटकेस भरल्या”

केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. अनेक उद्योगधंदे बंद असल्यानं अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीतही मोठी घट झाली आहे. परंतु सरकारनं उत्पादन शुल्क वाढवण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे कच्च्या तेलात झालेल्या घसरणीचा फायदा कोणालाही मिळणार नाही. मंगळवारी रात्रीपासून पेट्रोलवर १० रूपये तर डिझेलवर १३ रुपयाचे उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. मोदी सरकार सतत उत्पादन शुल्क वाढवून संपूर्ण फायदा आपल्या सुटकेसमध्ये भरून घेत आहे, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतीत होणाऱ्या घसणीचा फायदा सामान्य लोकांना झाला पाहिजे. परंतु प्रत्येक वेळी भाजपा सरकार उत्पादन शुल्क वाढवून हा फायदा आपल्या सुटकेसमध्ये भरत आहे. जो पैसा मिळत आहे त्यातून मजुर, मध्यम वर्ग, शेतकरी आणि उद्योंगाना कोणताही फायदा मिळत नाही. अखेर एवढा पैसा सरकार का जमवत आहे, असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला आहे.

आणखी वाचा- देश करोनाच्या संकटात असताना पेट्रोल डिझेलवरचे उत्पादन शुल्क वाढवणे चुकीचे- राहुल गांधी

दरम्यान प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जुना व्हिडीओ ट्विट करून त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. केंद्र सरकारनं पेट्रोल व डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलवर प्रति लिटर १० रुपये, तर डिझेलवर प्रति लिटर १३ रुपये उत्पादन शुल्क आकारले जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा भार तेल कंपन्यांवर पडणार आहे. त्यामुळे थेट सामान्य नागरिकांच्या खिशाला याची झळ सोसावी लागणार नाही. केंद्र सरकारनं घेतलेला हा निर्णय ६ मे पासून लागू करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 4:50 pm

Web Title: congress leader priyanka gandhi criticize pm narendra modi petrol diesel excise duty hike jud 87
Next Stories
1 देश करोनाच्या संकटात असताना पेट्रोल डिझेलवरचे उत्पादन शुल्क वाढवणे चुकीचे-राहुल गांधी
2 शून्य ते दोन लाख! आता भारतीय कंपन्याच दिवसाला बनवतात इतके PPE किट्स
3 शहरी भागातील ८७ टक्के भारतीय मोदी सरकारच्या करोनासंदर्भातील कामावर समाधानी
Just Now!
X