लक्ष्मी विलास बँक आर्थिक संकटात सापडल्याने आरबीआयने या बँकेवर निर्बंध लादले आहेत. १६ डिसेंबरपर्यंत म्हणजेच पुढील ३० दिवस हे निर्बंध लादण्यात आले आहेत. या कारवाईमुळे लक्ष्मी विलास बँकेच्या खातेदरांना महिनाभरासाठी फक्त २५ हजारांची रोख रक्कम काढता येणार आहे. मागील तीन वर्षे लक्ष्मी विलास बँकेला मोठ्या प्रमाणावर तोटा झाला आहे. अवाजवी कर्जवाटप, अनियमितता या सगळ्यामुळे लक्ष्मी विलास बँकेवर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध लादले आहेत. दरम्यान, जीडीपी, बँक अशा अनेक विषयांवरून काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे.

“बँक संकटात आहे आणि जीडीपीदेखील. महागाईदेखील एवढी जास्त यापूर्वी कधीही नव्हती. ना बेरोजगारी इतकी जास्त होती. जनतेचं मनोबल कमी होत आहे आणि सामाजिक न्याय दररोज तुडवला जात आहे. हा विकास आहे की विनाश?” असा सवाल राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रावर टीका केली आहे.

आणखी वाचा- चोवीस तासांत दोन बँकांवर कारवाई; लक्ष्मी विलास नंतर RBI कडून ‘या’ बँकेवर निर्बंध

दोन बँकांवर निर्बंध

गेल्या सलग तीन वर्षांपासून तोटा नोंदविणाऱ्या व निव्वळ मालमत्ता रोडावलेल्या लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध आले आहेत. ठेवीदारांना गरजेसाठी महिन्याभराकरिता २५ हजार रुपये काढण्याची मुभा मिळालेल्या बँकेचे डीबीएस या विदेशी बँकेबरोबरचे विलीनीकरण होणार आहे. लक्ष्मी विलास बँकेवर मंगळवारी सायंकाळपासूनच निर्बंध आणताना रिझव्‍‌र्ह बँकेने बँकेच्या ठेवीदारांना येत्या १६ डिसेंबपर्यंत अत्यावश्यक म्हणून २५ हजार रुपये काढण्याची मुभा दिली. दरम्यान, लक्ष्मी विलास बँकेनंतर रिझर्व्ह बँकेनं आणखी एका बँकेवर निर्बंध घातले आहेत. अवाजवी कर्जवाटप, अनियमितता या सगळ्यामुळे लक्ष्मी विलास बँकेवर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळेच आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध लादले आहेत.

याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील मंथा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर हे निर्बंध घालण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेनं या बँकेला काही निर्देश दिले आहेत. हे निर्देश १७ नोव्हेंबर २०२० ला बँक बंद होण्यापासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू राहणार आहे.