गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी भारतानं करोनाबाधितांच्या संख्येचा ५० लाखांचा टप्पा पार केला. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावरून विरोधकांनी सतत सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावरून सरकारवर निशाणा साधला आहे. करोना कालावधीमधील भाजपाचे ‘खयाली पुलाव’ असं म्हणत त्यांनी एक यादीच सादर केली आहे.

“२१ दिवसांमध्ये करोनावर मात करु, आरोग्य सेतू अ‍ॅपमुळे संरक्षण होईल, २० लाख कोटींचे पॅकेज, आत्मनिर्भर व्हा, सीमेवर कोणीही घुसखोरी केली नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे,” अशी यादी राहुल गांधी यांनी शेअर केली आहे. तसंच ही यादी शेअर कर ते एक सत्य होतं की संकटातील संधी असा सवालही त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला.

आणखी वाचा- भारतात करोनाग्रस्तांची संख्या ५० लाखांच्या पुढे, आत्तापर्यंत ८२ हजारांपेक्षा जास्त मृत्यू

आणखी वाचा- करोनाविरुद्धची लढाई अजून फार दूर; आरोग्यमंत्र्यांनी दिला सावधगिरीचा इशारा

यापूर्वीही पंतप्रधानांवर साधला निशाणा

“करोनाविरोधातील मोदी सरकारच्या ‘सुनियोजित लढाई’ने भारताला तळागाळशी ढकललं आहे. जीडीपीमधील ऐतिहासिक २४ टक्के घसरण, १२ कोटी रोजगार गेले, १५.५ कोटी रुपयांचे अतिरिक्त अडकलेले कर्ज, जगभरात करोनाचे दररोजचे सर्वाधिक रुग्ण व मृत्यू… मात्र भारत सरकार व माध्यमांसाठी ‘सब चंगा सी’,” असं राहुल गांधी म्हणाले होते.