28 February 2021

News Flash

“अन्नदात्यासह आता अन्नपूर्णेवरही वार…”; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

सिलिंडर दरवाढीवरून केंद्रावर टीका

संग्रहीत

तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलो वजनाचा गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर पाच किलोच्या गॅसच्या किंमतीत १८ रुपयांनी वाढ झाली. त्याचप्रमाणे १९ किलो सिलिंडरसाठी आता ३६.५० रुपये जास्त मोजावे लागणार आहे. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असणाऱ्या आयओसीने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये आता १४.२ किलो वजनाचा गॅस सिलिंडर ६४४ रुपयांना मिळणार असून कोलकात्यात तो ६७०.५० रुपये तर मुंबईत ६४४ रुपयांपर्यंत पोहचला आहे. चेन्नईमध्ये गॅस सिलिंडरसाठी ६६० रुपये मोजावे लागणार आहेत. या सिलिंडरच्या दरवाढीवरून काँग्रेचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

“आता अन्नदात्यासह अन्नपूर्णेवरही वार. देशाला आणखी किती लाचार करणार आहात?,” असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला आहे. सिलिंडरच्या करण्यात आलेल्या दरवाढीवरून त्यांनी ट्विटरद्वारे केंद्र सरकारवर निशाणा साधला.

सर्वसामान्यांच्या खिशाला दरवाढीची झळ

आजची दरवाढ होण्याआधी दिल्लीमध्ये १४.२ किलो गॅस सिलिंडरचे दर ५९४ रुपये इतके होते. कोलकात्यामध्ये ६२०.५० रुपये तर मुंबईमध्ये ५९४ रुपयांना गॅस सिलिंडर मिळायचा. मात्र आता यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार असणाऱ्या सर्वासामान्यांच्या खिशाला या दरवाढीची झळ बसणार आहे. १९ किलोच्या सिलिंडरची दिल्लीमधील किंमत १ हजार २९६ रुपये, कोलकात्यामध्ये एक हजार ३५१ रुपये ५० पैसै, मुंबईमध्ये एक हजार २४४ रुपये आणि चेन्नईमध्ये एक हजार ४१० रुपये ५० पैसे इतकी झाली आहे आहे. गॅस सिलिंडरवर देण्यात येणाऱ्या अनुदानाअंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी १२ गॅस सिलिंडरवर सूट देते. ग्राहकांना या कालावमध्ये अधिक सिलिंडर लागले तर त्यांना बाजार भावात ते विकत घ्यावे लागतात. तेल कंपन्या दर महिन्याला गॅस सिलिंडरच्या किंमतीची पडताळणी करुन आंतरराष्ट्रीय दर आणि विदेशातील दरांनुसार गॅस सिलिंडरचे दर निश्चित केले जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 7:19 pm

Web Title: congress leader rahul gandhi slams pm narendra modi central government over cylinder price hike farmers protest jud 87
Next Stories
1 JEE Main परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; चार टप्प्यात होणार परीक्षा
2 ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘गोड भेट’; मोदी सरकार देणार ३,५०० कोटींचं अनुदान
3 राम मंदिराच्या उभारणीसाठी मकर संक्रांतीपासून माघ पौर्णिमेपर्यंत निधी संकलन; चंपतराय यांची माहिती
Just Now!
X