काँग्रेस नेते राहुल गांधी यांना करोनाची लागण झाली आहे. राहुल गांधी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली. सौम्य लक्षणं आढळल्यानंतर चाचणी केली असता करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी यावेळी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यास सांगितलं आहे. नुकतंच राहुल गांधी यांनी करोनाचा कहर वाढत असल्याने पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व सभा रद्द करत असल्याची घोषणा केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द; राहुल गांधींचा मोठा निर्णय

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “सौम्य लक्षण जाणवल्यानंतर माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करा. सुरक्षित राहा”.

देशात पुन्हा एकदा करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होताना दिसत असून अनेक राजकीय नेत्यांनाही लागण होत आहे. नुकतंच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, सपा नेते अखिलेश यादव यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता राहुल गांधी करोना पॉझिटिव्ह झाले आहेत.

पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द
देशात करोनाचा कहर वाढत असल्याने राहुल गांधी यांनी आपल्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी रविवारी ट्विट करत ही माहिती दिली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, “करोनाची स्थिती लक्षात घेता मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व प्रचारसभा रद्द करत आहे. मी सर्व राजकीय नेत्यांना सल्ला देऊ इच्छितो की, त्यांनी सध्याच्या परिस्थितीत मोठ्या गर्दीत सभा घेण्याच्या परिणामांचा गांभीर्याने विचार करावा”.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader rahul gandhi tests positive for covid19 sgy
First published on: 20-04-2021 at 15:22 IST