27 February 2021

News Flash

Video: “प्रियंका चोप्रा.. जिंदाबाद!!”, काँग्रेसच्या सभेत लागले नारे

घोषणा ऐकून मंचावर उपस्थित असणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनाही हसू अनावर झाले

प्रियंका चोप्रा.. जिंदाबाद

सोनिया गांधी जिंदाबाद… काँग्रेस पार्टी जिंदाबाद… राहुल गांधी जिंदाबाद… प्रियंका चोप्रा जिंदाबाद… या घोषणा दिल्या गेल्या दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या एका सभेमध्ये. काँग्रेसचे नेते सुरेंद्र कुमार यांनी या घोषणा दिल्या. कुमार यांनी चूकून प्रियंका गांधींच्या नावाऐवजी बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या नावाने घोषा दिल्या आणि मंचावर उपस्थित असणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनाही हसू अनावर झाले. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनेही हा व्हिडिओ ट्विट केला आहे. अनेकांनी यावरुन काँग्रेसची खिल्ली उडवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दिल्लीमध्ये काँग्रेसने एका सभेचे आयोजन केले होते. या सभेसाठी दिल्ली काँग्रेसचे नेते सुभाष चोप्राही उपस्थित होते. या सभेमध्ये काँग्रेसचे नेता सुरेंद्र कुमार यांनी उपस्थित समर्थकांना उत्साह निर्माण करण्यासाठी मंचावरुन घोषणा देण्यास सुरुवात केली. सोनिया गांधी जिंदाबाद… काँग्रेस पार्टी जिंदाबाद… राहुल गांधी जिंदाबाद… च्या घोषणा जनतेने दिल्या. त्यानंतर शेवटी मात्र कुमार यांनी चक्क प्रियंका गांधींऐवजी प्रियंका चोप्राच्या नावाने घोषणा दिली. विशेष म्हणजे या घोषणेवरही समर्थकांनी जिंदाबादचा आवाज दिला. जिंदाबादचा आवाज आल्यानंतर कुमार यांना आपली चूक लक्षात आली तोपर्यंत उशीर झाला होता. समोर घडलेला प्रकार पाहून सुभाष चोप्राही इकडे तिकडे बघू लागले. हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर इतका व्हायरल झाला की प्रियंका चोप्रा ट्विटवर टॉप ट्रेण्डींग टॉपिक होती. “नशीब राहुल गांधी या सभेला नाही आले नाहीतर येथे राहुल बजाज जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या असत्या,” असा टोला एका युझरने या घटनेवर ट्विट करताना लगावला आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीने “प्रियंका चोप्रा काँग्रेसमध्ये कधी गेली?” असा सवाल उपस्थित केला.

दिल्लीमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी हळूहळू तयारी सुरु केली असून काँग्रेसने आयोजित केलेली ही सभा त्याचाच एक भाग होती. सत्ताधारी आम आदमी पार्टीला यंदा काँग्रेस आणि भाजपा असा दोन मोठ्या राष्ट्रीय पक्षांना एकाच वेळी तोंड द्यावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 8:47 am

Web Title: congress leader raised slogan priyanka chopra zindabad in congress rally scsg 91
Next Stories
1 लंडन ब्रिज हल्ल्याची जबाबदारी ‘आयसिस’ने स्वीकारली
2 दूरसंचार कंपन्यांकडून ५०टक्के शुल्कवाढ
3 जीएसटी संकलन पुन्हा एक लाख कोटींवर
Just Now!
X