03 March 2021

News Flash

काँग्रेस नेते सचिन पायलट करोना पॉझिटिव्ह

स्वतः ट्विट करुन दिली माहिती

काँग्रेस नेते सचिन पायलट हे करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांनी स्वतः या संदर्भातलं ट्विट करुन ही माहिती दिली आहे. जे कुणी माझ्या संपर्कात आलं असेल त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन सचिन पायलट यांनी केलं आहे. तसंच करोना संदर्भातले सगळी नियमावली पाळावी असंही त्यांनी म्हटलं आहे. मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेत आहे लवकरच करोनावर मात करुन पुन्हा सेवेत रुजू होईन असंही सचिन पायलट यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सचिन पायलट यांनी गेहलोत सरकारविरोधात बंडाचा झेंडा हाती घेतला होता त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणेच सचिन पायलट हे भाजपात जाणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान त्यांचं बंड शमलं आणि ते काँग्रेसमध्येच राहिले. मात्र राजस्थानच्या राजकारणाला सुरुंग लागतो की काय? अशी परिस्थिती सचिन पायलट यांनी निर्माण केली होती. मात्र त्यांचं बंड थंड झालं आणि मग काँग्रेस नेत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. याच सचिन पायलट यांना आता करोनाची बाधा झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 8:18 pm

Web Title: congress leader sachin pilot tested positive for covid 19 scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Bihar Result: पहिल्यांदाच नितीश कुमार मीडियासमोर; मुख्यमंत्रीपदासंबंधी केलं मोठं वक्तव्य
2 सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कुणाल कामराविरोधात खटला दाखल होणार
3 बिहारमध्ये राजकीय उलथापालथ? तेजस्वी यादव महागठबंधनचं सरकार स्थापन करण्याच्या तयारीत
Just Now!
X