News Flash

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे केंद्र सरकारची नौटंकी ; काँग्रेसची टीका

सर्जिकल स्ट्राईकचा उपयोग काय झाला?

फोटो सौजन्य- ANI

पाकिस्तानच्या मनसुब्यांना सुरुंग लावण्याचे काम आपले सैनिक नेहेमीच करत असतात. गेल्या वर्षी झालेल्या सर्जिकल स्ट्राईकची चर्चा देशभरात झाली. मात्र काँग्रेस नेते अजूनही या सर्जिकल स्ट्राईकवर टीका करताना दिसत आहेत. तसेच आठवड्याभरापूर्वीही भारतीय लष्कराचे एक विशेष पथक पुंछ सेक्टरमधून सीमारेषेच्या पलिकडे गेले. तिथून भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या रावळकोट सेक्टरमधील रूख चकरीमध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी गस्त घालणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला. या सगळ्या कारवाया होत असतानाच काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी सर्जिकल स्ट्राईक म्हणजे केंद्र सरकारची नौटंकी आहे असे म्हणत टीका केली. सैन्य दलांची सुरक्षा अबाधित ठेवणे या सरकारला जमत नाही आणि सरकारकडून सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केला जातो आहे याला काहीही अर्थ नाही असेही दीक्षित यांनी ‘एएनआय’शी बोलताना स्पष्ट केले.

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी केंद्र सरकारने सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केला. त्यानंतर किती हल्ले कमी झाले? या सर्जिकल स्ट्राईकचा पाकिस्तानवर काय परिणाम झाला? असे प्रश्न विचारत त्यांनी केंद्राने पाकिस्तानच्या घुसखोरीवर आणि वाढत्या हल्ल्यांवर वेगळ्या उपाययोजना केल्या पाहिजेत असाही सल्ला दीक्षित यांनी दिला आहे. पुलवामात दहशतवाद्यांनी सीआरपीएफवर हल्ला चढवला. या हल्ल्यात भारताचे पाच जवान शहीद झाले. काश्मीर खोऱ्यातही हल्ले सुरु असतात. ज्यामध्ये देशाचे जवान मारले जातात. मग सर्जिकल स्ट्राईक हे एकच चोख प्रत्युत्तर आहे का? असा प्रश्न दीक्षित यांनी उपस्थित केला.

उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकारने सर्जिकल स्ट्राईक केला होता. यामध्ये भारताच्या शूर जवानांनी पाकिस्तानाच्या सीमेपलिकडे जाऊन दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते. तसेच दहशतवाद्यांचा खात्माही केला होता. या सर्जिकल स्ट्राईकनंतर काँग्रेसकडून टीका करण्यात आली होती. सरकारने या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे द्यावेत अशी मागणी त्यावेळी संजय निरुपम यांनी केली होती. तसेच इतर काँग्रेस नेत्यांनीही सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईचे पुरावे मागितले होते. आता संदीप दीक्षित यांनीही याच सर्जिकल स्ट्राईकवर टीका केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 4:28 pm

Web Title: congress leader sandeep dikshit termed surgical strike natkiya alleged government is not capable to protect defence forces
Next Stories
1 मुझफ्फरनगर दंगल: हिंदू – मुस्लिमांमध्ये समझोता, मागे घेणार खटले
2 अजित डोवल- पाक सुरक्षा सल्लागारांच्या भेटीवर भारताचे मौन
3 शस्त्रसंधी उल्लंघनानंतरही क्रिकेट सामन्यांची अपेक्षा कशी करता? सुषमा स्वराजांनी पाकिस्तानला फटकारलं
Just Now!
X