03 August 2020

News Flash

स्मृती इराणींवर टीका करताना शशांक भार्गव यांची जीभ घसरली

पोलिसांत दाखल झाला गुन्हा

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. यावरून विरोधी पक्षानं सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु यादरम्यान काँग्रेस नेते शशांक भार्गव यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. दरम्यान, या प्रकरणानंतर शशांक भार्गव यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शशांक भार्गव यांनी मध्य प्रदेशातील विदिशामध्ये पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात सायकल रॅली काढली होती. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान आणि स्मृती इराणी यांच्यावर टीका केली. “लॉकडाउनमुळे देशाची अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे. यामुळे सरकारनं ही दरवाढ मागे घेतली पाहिजे. तेव्हा त्या बांगड्या घेऊन फिरत होत्या. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तीय आहेत. बांगड्यांसोबत जे काही द्यायचं ते देऊन जनतेच्या हितासाठी त्यांनी ही दरवाढ मागे घेण्यासाठी पंतप्रधानांना निवेदन द्यावं,” असं भार्गव म्हणाले.

भार्गव यांच्या या वक्तव्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या २९४ आणि ५०४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भार्गव यांच्यावर विनापरवानगी रॅली काढल्यामुळेही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विनायक वर्मा यांनी दिली. यादरम्यान, काही कार्यकर्त्यांनी भार्गव यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्या कार्यकालयाचीही तोडफोड केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एसपी वर्मा यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल डिझेलचे दर दररोज वाढत आहे. एकीकडे करोनाचं संकट असताना दुसरीकडे ही होणारी दरवाढ अन्यायकारक असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 2:18 pm

Web Title: congress leader shashank bhargav on pm narendra modi smriti irani petrol disel price hike jud 87
Next Stories
1 जम्मू-काश्मीर : नार्को टेरर मोड्युल उध्वस्त, दोघांना अटक
2 चीनच्या नऊ महिने आधी ‘या’ देशातील सांडपाण्यात आढळले होते करोना व्हायरसचे नमुने
3 पोलिसांच्या अमानुष मारहाणीत पिता-पुत्राचा मृत्यू, तामिळनाडूतील घटनेचा देशभरातून निषेध
Just Now!
X