01 March 2021

News Flash

कमल न तोड़ ले ये हाथ कहीं …; शशी थरूर यांचा राजनाथ सिंग यांना टोला

शशी थरूर यांची राजनाथ सिंह यांच्यावर टीका

भारत-चीन यांच्यातील सीमावादावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शायराना अंदाजात मोदी सरकारवर टीका केली होती. अमित शाह यांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना शेर ट्विट करून सरकारला टोला लगावला होता. राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही शायरीतून उत्तर दिलं होतं. त्यावर काँग्रेसचे नेते शशी खरूर यांनीदेखील तशाच पद्धतीनं उत्तर दिलं आहे. “हातावरून आता लक्ष हटवा आणि देशाच्या सीमेची सुरक्षा करा,” असं म्हणत थरूर यांनी राजनाथ सिंह यांना टोला लगावला.

“कमल न तोड़ ले ये हाथ कहीं, ध्यान सारा इधर लगाए हैं ! हाथ से ध्यान हटा दीजिये, आप सीमा की सुरक्षा कीजिये !,” असं म्हणत शशी थरूर यांनी राजनाथ सिंह यांच्यावर निशाणा साधला.

पण झाली होती चूक…

भारत-चीन यांच्यातील सीमावादावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शायराना अंदाजात मोदी सरकारवर टीका केली होती. अमित शाह यांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना शेर ट्विट करून सरकारला टोला लगावला होता. राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही शायरीतून उत्तर दिलं होतं. पण, हे उत्तर देण्याच्या नादात सिंह यांच्याकडून चूक झाली.

आणखी वाचा- राहुल गांधींना शायराना अंदाजात उत्तर देण्याच्या प्रयत्नात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून झाली चूक

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रॅलीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताच्या सीमा संरक्षणाच्या सामर्थ्याबद्दल भाष्य केलं होतं. “भारताच्या संरक्षण धोरणाला जागतिक मान्यता मिळाली आहे. अमेरिका आणि इस्रायलनंतर आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी कुठला देश सक्षम असेल तर, तो भारत आहे. संपूर्ण जगाने हे मान्य केले आहे” असं शाह म्हणाले होते.

आणखी वाचा- “या तथाकथित व्हर्च्युअल रॅली करोनाचा प्रसार नियंत्रित करणार का?, गमावलेला रोजगार परत आणणार का?”

शाह यांच्या विधानावर राहुल गांधी यांनी मिर्झा गालिब यांच्या “हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन, दिल के ख़ुश रखने को ‘ग़ालिब’ ये ख़याल अच्छा है,” या शेरचं विडंबन करत टीका केली होती. “सब को मालूम है ‘सीमा’ की हक़ीक़त लेकिन, दिल के ख़ुश रखने को, ‘शाह-यद’ ये ख़्याल अच्छा है।,” असं म्हणत राहुल यांनी केंद्रावर शायराना अंदाजात निशाणा साधला होता.

आणखी वाचा- “कोणतंही काम न करता नुसती बडबड करणारे चॅम्पियन परतले”, नुसरत जहाँचा अमित शाह यांना टोला

राहुल गांधी यांनी शायरीतून टीका केल्यानं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही त्याच भाषेत राहुल गांधींना उत्तर दिलं. “‘हाथ’ में दर्द हो तो दवा कीजै, ‘हाथ’ ही जब दर्द हो तो क्या कीजै,” असं विडंबनात्मक शायरीतून राहुल यांना टोला लगावला होता. मात्र, हा शेर ट्विट करताना राजनाथ सिंह यांच्याकडून चूक झाली. हा शेर मिर्झा गालिब यांचा असल्याचा दावा राजनाथ यांनी केला होता. मात्र, मुळात शेर मंजर लखनवी यांचा आहे. “दर्द हो दिल में तो दवा कीजे, और जो दिल ही न हो तो क्या कीजे,” असा हा मंजर लखनवी यांचा मूळ शेर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 3:57 pm

Web Title: congress leader shashi tharoor criticize defense minister rajnath singh shayari rahul gandhi amit shah twitter jud 87
Next Stories
1 केरळमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यू, अंगावर आढळल्या जखमा
2 ज्योतिरादित्य शिंदे करोना पॉझिटिव्ह; दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू
3 भारत आणि चीनला आपल्या जनतेला फसवायचंय म्हणूनच…; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
Just Now!
X