News Flash

काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सचिन पायलट यांना पक्षातून काढण्याची मागणी

गेहलोत सरकारच्या स्थिरतेलाच धोका

मतभेद पहिल्यापासूनच होते, फक्त आज हे मतभेद सरकार कोसळण्यापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. सचिन पायलट यांनी थेट अशोक गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला आहे. म्हणजेच सरकारच्या स्थिरतेलाच त्यांनी अप्रत्यक्षपणे आव्हान दिले आहे.

राजस्थानात सत्तासंघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकवल्यामुळे गेहलोत सरकारच्या स्थिरतेलाच धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान आता जयपूरच्या फेअरमाँट हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक सुरु आहे. या बैठकीला १०२ आमदार उपस्थित असून त्यांनी सचिन पायलट यांना पक्षातून काढण्याची मागणी केली आहे. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

बंडखोर सचिन पायलट आणि बैठकीला अनुपस्थित असलेल्या अन्य आमदारांवर कारवाई करण्याचा ठराव काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत करण्यात आल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

काँग्रेसमधील सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने सचिन पायलट यांनी स्वत:साठी मुख्यमंत्रीपद मागितल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय सचिन पायलट यांनी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश पांडे यांना हटवण्याची आणि महत्त्वाच्या पदांवर आपल्या माणसांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 1:11 pm

Web Title: congress legislative party clp meeting at fairmont hotel in jaipur dmp 82
Next Stories
1 “गांधी घराण्याचे लोक जोपर्यंत काँग्रेसमध्ये असतील तोपर्यंत…”; उमा भारतींची तिखट प्रतिक्रिया
2 अग्रिमा जोशुआला बलात्काराची धमकी देणाऱ्याला अटक
3 रशियाची बहुचर्चित लस बाजारात कधी येणार?; उत्तर मिळालं
Just Now!
X