13 July 2020

News Flash

बंगालमध्ये सीपीआयएम-काँग्रेस आघाडी?

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाकपशी आघाडी करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाकपशी आघाडी करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसशी टक्कर देण्यासाठी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाकपशी आघाडी करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी राज्यातील नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीत संभाव्य आघाडीवर चर्चा करण्यात आली. परंतु गेल्या वीस महिन्यांत संसदेच्या प्रत्येक अधिवेशनात तृणमूल काँग्रेस पक्ष लोकसभेत सातत्याने काँग्रेसच्या मदतीला धावून आला. त्यामुळे खुद्द राहुल गांधी तृणमूल काँग्रेसशी युती करण्यास उत्सुक आहेत. परंतु स्थानिक नेत्यांनी केलेल्या तक्रारीमुळे राहुल गांधी यांना विचार बदलावा लागला. पश्चिम बंगालमध्ये अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या काँग्रेसने भाकपसमवेत आघाडीचा निर्णय घेतला आहे.
बंगालमधील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा तृणमूल काँग्रेसशी हातमिळवणी करण्यास विरोध आहे. बैठकीत सहभागी झालेल्या किमान वीस नेत्यांनी अधीर रंजन चौधरी यांना समर्थन दिले. त्यामुळे बंगालमध्ये डावे व काँग्रेस नेते ममतादीदींविरोधात प्रचार करताना दिसणार आहेत. तृणमूल विरोधात प्रचाराचा फायदा होईल. सर्व ठिकाणी उमेदवार उभे करण्याऐवजी प्रभावक्षेत्रावर लक्ष केंद्रित करता येईल. त्यामुळे काँग्रेस आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता अधीर रंजन चौधरी यांनी बैठकीत व्यक्त केली. या बैठकीत खासदार अभिजित मुखर्जी यांनी मात्र भाकपपासून काँग्रेसला धोका असण्याची भीती व्यक्त केली. मात्र त्यांच्या मताला फारसे महत्त्व देण्यात आले नाही. माजी खासदार दीपा दासमुन्श, आमदार मानस भुईया यांनी मात्र काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव मांडला. भाकपशी आघाडी केल्याने स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही. त्यामुळे स्वबळावरच निवडणूक लढवण्याची मागणी त्यांनी केली. राहुल गांधी बुधवारी सोनिया गांधी यांच्याशी पश्चिम बंगालसंदर्भात चर्चा करणार आहेत.

तृणमूलची टीका
पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याच्या काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या प्रयत्नांवर तृणमूल काँग्रेसने टीका केली आहे. राज्याच्या राजकारणात सक्रिय राहण्याचा हा दोन्ही पक्षांचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे तृणमूलने म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांची डाव्या पक्षांसमवेत आघाडी करण्याची इच्छा असली तरी त्याबाबतही दोन मतप्रवाह आहेत, असे राज्यातील नेत्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना सांगितल्यानंतर तृणमूलने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तथापि, हा दोन्ही पक्षांचा राज्यातील राजकारणात सक्रिय राहण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, असे तृणमूलच्या एका नेत्याने म्हटले आहे. काँग्रेस आणि डावे यांच्यात आघाडी झाली तर काँग्रेसची बहुसंख्य मते तृणमूलला मिळतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2016 2:25 am

Web Title: congress may ally with kerala rival left in west bengal polls
टॅग Congress
Next Stories
1 भाजपकडून पीडीपीला शिवसेनेसारखी वागणूक
2 अभिनेते अनुपम खेर यांना पाकिस्तानने व्हिसा नाकारला
3 कांद्याचे दर घसरले; प्रतिकिलो ९.५० रुपये
Just Now!
X