13 November 2019

News Flash

काँग्रेस नेता म्हणाला होता, मुस्लीमांना गटारात रहायचं असेल तर राहू द्या : मोदी

अभिभाषणाच्या उत्तरात पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देतांना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका करण्याची संधी सोडली नाही. त्यांनी अनेक जुन्या नव्या मुद्दयांवरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. शाह बानो प्रकरणावरून देखील त्यांनी काँग्रेस नेत्याने त्यावेळी केलेल्या विधानाचा उल्लेख करत काँग्रेसने कशाप्रकारे मुस्लिमांना दुय्यम स्थान दिले हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.

याबाबत बोलताना मोदी म्हणाले की, शहा बानो प्रकरणी काँग्रेसला संधी मिळाली होती. सर्वोच्च न्यायालयाने देखील पुर्ण मदत केली होती. देशात लिंग समानतेच्यादृष्टीने एक पोषक वातावरण देखील तयार झाले होते. मात्र काँग्रेसने ही संधी देखील गमावली. आज पुन्हा ३५ वर्षानंतर काँग्रेसला संधी मिळाली आहे. महिलांच्या सन्मानासाठी आम्ही विधेयक घेऊन आलो आहोत. याला कोणत्याही संप्रदायाशी जोडण्याची आवश्यकता नाही. शाह बानोचे प्रकरण जेव्हा सुरू होते तेव्हा काँग्रेसचे जे कोणी मंत्री होते त्यांनी टीव्हीवरील एका मुलाखती दरम्यान जे काही म्हटले होते ते धक्कादायक होते. माझ्याकडे त्याची पडताळी करून पाहण्याचा वेळ नव्हता पण मला जे मिळालं आहे ते मी सांगतो आहे. या मुलाखतीत काँग्रेस नेत्याने त्याकाळातल्या काँग्रेसच्या मंत्र्यांच्या तोंडून काय निघत होते ते म्हटले असल्याचे सांगत, मुस्लिमांच्या उत्थानाची जबाबदारी काँग्रेसची नाही, जर त्यांना गटारात रहायचं असेल तर राहू द्या. असे काँग्रेसच्या नेत्याने म्हटले असल्याचे मोदी म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले की, हा किती गंभीर विषय आहे, ते देखील आपल्या देशाचे नागिरक आहेत, त्यांना पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे.

मोदींच्या या विधानानंतर सभागृहातील काँग्रेस नेत्यांना आक्षेप नोंदवत याचा पुरावा काय आहे, तो सादर करा अशी मागणी केली. त्यावर मोदी म्हणाले की, तुम्हाला पुरावा मिळेल. मी यासंदर्भातील यु ट्युबची लिंक पाठवेल. तर या अगोदर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीवर निशाणा साधत मोदी म्हणाले की, आम्हाला विचारले जाते की तुम्ही काहीजणांना तुरूंगात का टाकत नाहीत. तर याचे उत्तर हे आहे की, ही काही आणीबाणी नाही. कुणालाही तुरूंगात पाठवयला. हा न्यायप्रक्रियेचा भाग आहे. ज्यांना जामीन मिळाला आहे त्यांनी आनंद लुटावा.

First Published on June 25, 2019 7:23 pm

Web Title: congress ministers said about muslims if they want to lie in the gutter let them be msr87