05 March 2021

News Flash

काँग्रेसमधील गळती सुरूच; पोटनिवडणुकीच्या तोंडावर आणखी एक आमदार भाजपात

१५ दिवसात तीन आमदारांनी सोडली काँग्रेस

काँग्रेसचे नेते राहुल गांधी. (संग्रहित छायाचित्र)

मध्य प्रदेशातील माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसला गळती लागली होती. ही गळती अजूनही थांबल्याचे दिसत नाही. महिनाभरात काँग्रेसच्या तिसऱ्या आमदाराने राजीनामा दिला असून, भाजपात प्रवेश केला आहे. मध्य प्रदेशात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीच्या आधीच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.

काँग्रेसचे आमदार नारायण पटेल यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी मंजूरही केला आहे. राजीनामा मंजूर झाल्यानंतर नारायण पटेल यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विट करून नारायण पटेल यांचं भाजपात स्वागत केलं आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसच्या २४ आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. तर मागील १५ दिवसांत तिसऱ्या आमदारानं काँग्रेसला राम राम ठोकला आहे. नारायण पटेल यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या आमदारांचा संख्या आता ८९ वर आली आहे.

भाजपाकडे सध्या १०७ आमदार असून, त्यांना पूर्ण बहुमतासाठी ९ आमदारांची गरज आहे. दुसरीकडे मध्य प्रदेश विधानसभेत ४ अपक्ष, २ बसपा आणि १ समाजवादी पक्षाचा आमदार आहे. शुक्रवारी बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील नेपानगर मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार सुमित्रा देवी कास्डेकर यांनी राजीनामा दिला होता. प्रद्युम्न सिंह लोधी यांनीही आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 8:52 pm

Web Title: congress mla narayan patel left congress and join bjp bmh 90
Next Stories
1 दोन चोरट्यांनी पळवलं पैशाचं पाकीट, एटीएमचा पिन विचारायला परत आले आणि फसले…
2 RBI कर्ज घेऊन मोदी सरकारला किती दिवस उधार देणार?-रघुराम राजन
3 अमेरिकेत दर तासाला २६०० जण होत आहेत करोना बाधित
Just Now!
X