05 March 2021

News Flash

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या यांची वर्णी

कर्नाटक विधानसभेतील कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांनी मुख्यमंत्रीपदासाठी शुक्रवारी पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांच्या पारड्यात आपले मत टाकले.

| May 10, 2013 05:46 am

कर्नाटक विधानसभेतील कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांनी मुख्यमंत्रीपदासाठी शुक्रवारी पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांच्या पारड्यात आपले मत टाकले. सिद्धरामय्या हेच आता कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असणार, हे आता स्पष्ट झाले आहे. 
मुख्यमंत्रीपद कोणाला द्यावे, हे जाणून घेण्यासाठी अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीच्या चार सदस्यांनी शुक्रवारी नवनिर्वाचित आमदारांचे गोपनीय पद्धतीने मतदान घेतले. त्यामध्ये सर्वाधिक आमदारांनी सिद्धरामय्या यांच्या पारड्यात आपले मत टाकले. केंद्रीय मंत्री मल्लिकार्जुन खर्गे हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते.
मुख्यमंत्रीपदासाठी जास्तीत जास्त आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सिद्धरामय्या आणि खर्गे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी माजी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचीही भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे २० मिनिटे चर्चा झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 5:46 am

Web Title: congress mlas pick siddaramaiah as next karnataka chief minister
टॅग : Karnataka Election
Next Stories
1 अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या नराधमांच्या कोठडीत २३ मेपर्यंत वाढ
2 गीतिका आत्महत्या: गोपाल कांडाविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश
3 निवडणुकांमध्ये घातपात घडविण्याची पाकिस्तानी तालिबान्यांची धमकी
Just Now!
X