27 January 2021

News Flash

दारुच्या नशेत पोलिसाला मारहाण करणाऱ्या काँग्रेस आमदाराच्या मुलाला अटक

मुलासहित अन्य दोघांना अटक

संग्रहित

पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी कर्नाटकमधील काँग्रेस आमदार नसीर अहमद यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. फैयाज असं नसीर अहमद यांच्या मुलाचं नाव आहे. फैयाजने रविवारी रात्री कर्तव्यावर असणाऱ्या बंगळुरु पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला. पोलिसांनी याप्रकरणी फैयाजसोबत अजून दोघांना अटक केली आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घातला तेव्हा फैयाज दारुच्या नशेत होता असा आरोप आहे. याशिवाय त्याने हेड कॉन्स्टेबलवर प्राणघातक हल्लादेखली केला. रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास बंगळुरुमधील अमृथल्ली पोलीस स्टेशनजवळ हा सगळा प्रकार घडला. “उड्डाणपूलाजवळ पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे,” अशी माहिती बंगळुरु (उत्तर पूर्व) डीसीपी सी के बाबा यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 11:16 am

Web Title: congress mlcs son arrested in bengaluru for assaulting cop in drunken state sgy 87
Next Stories
1 करोनात काहीही होऊ शकतं! झालं असं की… पीपीई किट घालून करावं लागलं लग्न
2 याला म्हणतात नशीब! २०० रुपये भाडयावर घेतलेल्या जमिनीत शेतकऱ्याला सापडला ६० लाखाचा हिरा
3 ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील अभिनेत्रीचे निधन
Just Now!
X