भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र त्यांच्या या आजारावर टीका करताना काँग्रेसचे खासदार बी. के हरिप्रसाद यांची जीभ घसरली आहे. एबीपी न्यूजशी बोलताना बी. के. हरिप्रसाद म्हटले , ‘अमित शाह को सुअर जुकाम हो गया’ असे म्हटले आहे. तसेच त्यांना कर्नाटकच्या जनतेचा शाप लागला आहे अशीही टीका हरिप्रसाद यांनी केली.

कर्नाटकच्या सत्तेत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात अमित शाह यांना ‘सुअर जुकाम’ ची लागण झाली अशीही टीका हरिप्रसाद यांनी केली. अमित शाह हे राहुल गांधी यांच्यावरही टीका करत असतात, या सगळ्याचा परिणाम झाल्यानेच त्यांना हा आजार जडला असेही हरिप्रसाद यांनी म्हटले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना बुधवारी रात्री एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र त्यांच्यावर टीका करताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली आहे.

या टीकेवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही टीका केली आहे. काँग्रेसने अमित शाह यांच्या आजाराबाबत ज्या प्रकारे गलिच्छ वक्तव्य केलं आहे ते निषेधार्ह आहे. काँग्रेस किती खालच्या पातळीला जाऊन टीका करू शकते हे दाखवणारं आहे. स्वाइन फ्लू या आजारावर उपचार होऊ शकतात. मात्र काँग्रेस नेते मनोरुग्ण आहेत त्यांच्यावर उपचार होणे कठीण आहे या आशयाचा ट्विट पियुष गोयल यांनी केला आहे.

अमित शाह यांच्यावर उपचार सुरु आहेत. ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना सगळेच भाजपा नेते करत आहेत. अशात आता काँग्रेस खासदाराने त्यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याने काँग्रेसवर टीकेचा भडीमार होतो आहे.