05 August 2020

News Flash

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून पी. चिदंबरम यांना उमेदवारी

आमदारांनी राज्यसभेसाठी बाहेरच्या राज्यातील उमेदवार लादू नका, अशी उघड मागणी केली होती.

माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम

काँग्रेसकडून शनिवारी राज्यसभेसाठीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातून माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील आमदारांनी राज्यसभेसाठी बाहेरच्या राज्यातील उमेदवार लादू नका, अशी उघड मागणी केली होती. मात्र, चिदंबरम यांच्या या निवडीमुळे पक्षनेतृत्त्वाने या मागणीकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसते. पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब केले.
राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस आमदारांची मंगळवारी बैठक झाली होती. त्यावेळी बाहेरच्या राज्यातील नेत्याचे ओढणे गळ्यात बांधू नका, राज्यातील कोणत्याही नेत्याला संधी द्या, अशी मागणी काँग्रेस आमदारांकडून करण्यात आली होती.

राज्यसभेसाठी काँग्रेस उमेदवारांची यादी
महाराष्ट्र- पी. चिदंबरम, पंजाब- अंबिका सोनी, उत्तर प्रदेश- कपिल सिब्बल, कर्नाटक- ऑस्कर फर्नांडिस, कर्नाटक- जयराम रमेश, उत्तराखंड- प्रदीप तम्टा, मध्य प्रदेश- विवेक तंखा, छत्तीसगड- छाया वर्मा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 5:34 pm

Web Title: congress nominate p chidambaram for rajya sabha from maharashtra
Next Stories
1 राष्ट्रगीत सुरू असताना फुटीरतावाद्यांशी बोलत होतात का; फारूख अब्दुल्लांवर भाजपची टीका
2 CBSE result : सीबीएसई दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर
3 नवाज शरीफ यांची ओपन हार्ट सर्जरी; मोदींनी दिल्या सदिच्छा
Just Now!
X