दीड वर्षांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी फरिदाबादच्या सूरजकुंड येथे दिवसभर मंथन केले. आजच्या चर्चेतून पक्षाला ठोस योजना आखता येतील, असा विश्वास सोनिया यांनी व्यक्त केला.
सरकार आणि काँग्रेस पक्षातील संवाद हा केवळ महत्त्वाच्या निर्णयांपुरताच मर्यादित आहे. पक्षाने सरकारच्या आणि सरकारने पक्षाच्या अडचणी समजून घेण्यासाठी व्यापक समन्वयाची आवश्यकता सोनिया गांधी यांनी व्यक्त केली. मंत्र्यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून त्यांच्या चिंता समजून घ्याव्यात. राज्यांमध्ये कार्यक्रमांसाठी जाताना पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना भेटण्यावर भर द्यावा, अशा सूचना सोनियांनी केल्या. विरोधी पक्ष राजकीय, नैतिक आणि धोरणात्मक स्तरावर भ्रम पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सत्तेसाठी धडपडणाऱ्या विरोधकांच्या अपप्रचाराला ठोस प्रत्युत्तर द्यायचे आहे. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी आमच्यापाशी अठरा महिने आहेत. सरकारच्या योजनांचा राजकीय लाभ उठवितानाच २००९ च्या लोकसभा निवडणुकीत अपूर्ण राहिलेल्या वचननाम्यातील आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी काँग्रेसजनांनी झोकून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
सोनिया गांधी, राहुल गांधी तसेच मनमोहन सिंग वगळता काँग्रेसचे सर्व केंद्रीय मंत्री वोदाधिकारी सकाळी काँग्रेस मुख्यालयातून सूरजकुंड येथे लक्झरी बसने रवाना झाले. या संवाद बैठकीत काँग्रेस कार्यकारिणीचे ३५ पदाधिकारी तसेच ३५ केंद्रीय मंत्री भाग घेणार होते, पण काँग्रेसचे सरचिटणीस विलास मुत्तेमवार, दिनशॉ पटेल, राजशेखर आणि चिरंजीवी विविध कारणांमुळे अनुपस्थित राहिले. सोनिया गांधी यांच्या प्रारंभिक निवेदनानंतर या बैठकीत पंतप्रधान मनमोहन सिंग, अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि राहुल गांधी यांच्यासह एकूण ४० नेत्यांनी पक्षाला भेडसावणाऱ्या विविध मुद्दय़ांवर आपले विचार मांडले. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि चिदंबरम यांनी जागतिक मंदी,  वित्तीय तुटीचे संकट, अन्न, पेट्रोलियम पदार्थ आणि खतांवरील अनुदानांचे वाढते ओझे यांचा परामर्श घेत सरकारपुढील आव्हाने पक्षापुढे मांडली.

narendra modi rahul gandhi lalu yadav
“मुघलांच्या मानसिकतेतून…”, राहुल गांधी – लालू यादवांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका
Leaders of India will have a power show tomorrow and organize a meeting at Ramlila ground in Delhi
‘इंडिया’च्या नेत्यांचे उद्या शक्तिप्रदर्शन, दिल्लीत रामलीला मैदानावर सभेचे आयोजन; विरोधकांच्या एकजुटीला बळ
Former Congress MLA Namdev Usendi resigned alleging that money was the criterion for ticket distribution in Congress
काँग्रेसमध्ये तिकीट वाटपासाठी पैशांचा निकष, गंभीर आरोप करून काँग्रेसचे माजी आमदार उसेंडी यांचा राजीनामा