09 March 2021

News Flash

राहुल गांधींचा राम अवतार पाहिलात का?

हे पोस्टर पाहून भाजपाच्या नेत्यांना राग येईल हे नक्की

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचे शिवभक्त असलेले पोस्टर झळकलेले आपण पाहिलेच होते. मात्र आता प्रभू रामचंद्रांच्या अवतारात राहुल गांधींना दाखवण्यात आले आहे. तसेच ‘वे राम नाम जपते रहे, तुम बनकर राम जियो रे’ असा संदेशही या पोस्टरवर लावण्यात आला आहे. भाजपाच्या नाकाला मिरच्या झोंबणारे हे पोस्टर बिहारमधील पाटणा या ठिकाणी लावण्यात आले आहे. हे पोस्टर पाहून भाजपाचा तीळपापड होऊ शकतो यात शंका नाही.

राम मंदिराचा मुद्दा देशभरात गाजतो आहे, मंदिराच्या मुद्द्यावरून सगळ्याच पक्षांनी राजकारण सुरु केलं आहे. अशात आता काँग्रेसनेही या वादात उडी घेतली आहे. त्यांनी थेट राहुल गांधींनाच राम अवतारात दाखवले आहे. काँग्रेसची 3 फेब्रुवारीला पाटण्यात रॅली आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटणा शहरात पोस्टर्स लावण्यात आले आहेत. राहुल गांधी या रॅलीला हजर रहाणार आहेत. त्यामुळे पाटणा येथील रस्तोरस्ती राहुल गांधींचे पोस्टर लावण्यात आले आहेत. अशातच विजय कुमार सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना राम अवतारात दाखवत जन आकांक्षा रॅलीचे पोस्टर लावले आहे. या पोस्टरवर सोनिया गांधी, प्रियंका गांधी, मनमोहन सिंग यांचेही फोटो आहेत. तर राहुल गांधींना धनुष्यबाण घेतलेल्या रामाच्या अवतारात दाखवण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले पोस्टर भाजपा नेत्यांचा त्रास वाढवणारे आहे. ते राम नामाचा जप करत राहिले तुम्ही राम होऊन जगा असा संदेश पोस्टरमध्ये देण्यात आला आहे. याचा पोस्टरचा कसा परिणाम होणार हे पहाणे महत्त्वाचे आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या आधी राहुल गांधी यांना शिवभक्त राहुल गांधी असे संबोधत पोस्टर लावण्यात आले होते. तसेच राहुल गांधी यांनी अनेक मंदिरांचाही दौरा केला होता. आता राहुल गांधी यांना रामाच्या अवतरात दाखवण्यात आले आहे. याचाच अर्थ काँग्रेसने भाजपाकडून राम मंदिराचाही मुद्दा हायजॅक करण्याचे ठरवलेले दिसते. आता या पोस्टरला भाजपाकडून कसे आणि काय उत्तर दिले जाईल ते पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 6:03 pm

Web Title: congress posters in bihar show rahul gandhi as lord ram
Next Stories
1 १० खून करुन पाप धुण्यासाठी कुंभमेळा गाठला, आणि…
2 चहावाल्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर, जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास
3 हनुमानाची जात काढून भाजतायत राजकीय पोळी – अजित पवार
Just Now!
X