25 February 2021

News Flash

राहुल गांधी नांदेडमधून लोकसभा निवडणूक लढवणार?

राहुल गांधींच्या नांदेडमधून निवडणूक लढवण्याच्या चर्चेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विधानाने पुष्टी मिळत असल्याने चर्चेला तोंड फुटले आहे.

काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तयारीला लागले आहेत. दरम्यान, त्यांच्या पारंपारिक अमेठी मतदारसंघाबरोबरच ते अन्य तीन जागांवरुन निवडणूक लढवतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यामध्ये राज्यातील नांदेड आणि मध्य प्रदेशातील एखाद्या सुरक्षित जागेवरुन ते निवडणूक लढवतील असेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राहुल गांधींच्या नांदेडमधून निवडणूक लढवण्याच्या चर्चेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विधानाने पुष्टी मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते लोकसभेच्या कोणत्याही जागेवरुन यशस्वीपणे निवडणूक लढू शकतात, जर त्यांनी नांदेडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांचे स्वागत आहे,’ असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

अशोक चव्हाण हे २०१४ मध्ये नांदेडमधून लोकसभा निवडणूक जिंकले होते. एक महिन्यापूर्वी जेव्हा त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ सदस्यांची बैठक घेतली तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांना याच वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन केले होते. कारण, चव्हाण हे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार आहेत.

राहुल गांधी हे अमेठीतून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. गांधी यांनी २००४ मध्ये राजकारणात प्रवेशाची घोषणा केली होती. २००४ मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले होते. त्यानंतर २००९ आणि २०१४ मध्येही ते या ठिकाणाहून जिंकले होते. दरम्यान, २०१४ मध्ये मोदी लाटेमध्ये भाजपाने अमेठीतून राहूल गांधींविरोधात स्मृती ईरानींना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचा इथे पराभव झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 10:28 am

Web Title: congress president rahul gandhi may contest 2019 loksabha polls from nanded seat
Next Stories
1 ’48 तासांत मायावतींची माफी मागा अन्यथा…’
2 दिल्लीत दहशतवादी घुसल्याचा संशय; गुप्तचर यंत्रणाकडून अॅलर्ट जारी
3 लोकसभा निवडणूक लढवणार का? करिना कपूर म्हणते…
Just Now!
X