News Flash

Rafale Deal : पर्रिकर तुमच्यावर खूप दबाव आहे हे मी समजू शकतो – राहुल गांधी

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राहुल गांधींना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर राहुल गांधींनीही पत्राद्वारे मनोहर पर्रिकर यांना उत्तर दिले आहे.

राहुल गांधी

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राहुल गांधींना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर राहुल गांधींनीही पत्राद्वारे मनोहर पर्रिकर यांना उत्तर दिले आहे. गोव्यामध्ये काल आपली भेट झाली. त्यावेळी आपल्या दोघांमध्ये काय बोलणे झाले ते मी कोणालाही सांगितलेले नाही. तुम्हाला भेटल्यानंतर मी जी दोन भाषणे केली त्यात आधीच जे सर्वांसमोर आहे त्याचाच मी उल्लेख केला.

मी तुमची भेट घेतली ती पूर्णपणे व्यक्तीगत आणि तुमच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी होती. तुम्ही अमेरिकेत उपचार घेत असताना तुमच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठीही मी फोनही केला होता. आपल्या कालच्या भेटीनंतर तुमच्यावर खूप दबाव आहे हे मी समजू शकतो. या दबावामुळेच तुम्हाला पंतप्रधान मोदींप्रती निष्ठा दाखवावी लागत आहे. त्यांचे सहकारी माझ्यावर टीका करत आहेत असे राहुल यांनी पत्रात म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. त्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. मनोहर पर्रिकर यांनी मला सांगितले की, नव्या राफेल डीलशी माझा काहीही संबंध नाही. नरेंद्र मोदींनी अनिल अंबानीला फायदा मिळवून देण्यासाठी हा सर्व खेळ केला, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

त्यावर मनोहर पर्रिकर यांनी “आपण फक्त ५ मिनिटे भेटलो, त्या भेटीचा वापरही तुम्ही क्षुल्लक राजकारणासाठी करत आहात, या पाच मिनिटांच्या भेटीत एकदाही राफेल करारावर चर्चा झाली नाही,” असे स्पष्टीकरण पर्रिकर यांनी दिले. पर्रिकर म्हणतात, तुम्ही मंगळवारी कोणतीही पूर्वसूचना न देता माझी भेट घेण्यासाठी आलात. माझ्या प्रकृतीची विचारपूस केली.

भारतीय राजकारणामध्ये पक्षातील भेद बाजुला ठेवत प्रतिस्पर्ध्यांना चांगलं आरोग्य चिंतण्याची परंपरा आहे. तुमच्या या कृतीचे मी स्वागत करतो. पण प्रसारमाध्यमांमध्ये आलेली तुमची वक्तव्ये बघून मला धक्काच बसला. या वृत्तांनुसार तुम्ही माझा दाखला देत काही विधाने केलीत. मला राफेल कराराविषयी माहिती नव्हती, असे पर्रिकरांनी सांगितल्याचे तुम्ही म्हणालात. पण आपली भेट फक्त पाच मिनिटे झाली, या भेटीत आपल्यात राफेल करारावर चर्चा देखील झाली नाही, असे पर्रिकरांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2019 9:55 pm

Web Title: congress president rahul gandhi writes to goa cm manohar parrikar
Next Stories
1 राहुल गांधींचे वडिल मुस्लिम, आई ख्रिश्चन मग ते ब्राह्मण कसे ? – अनंत कुमार हेगडे
2 विकृती! महात्मा गांधींच्या पुतळयाला गोळी मारुन हिंदू महासभेने साजरी केली गांधी पुण्यतिथी
3 व्हिडिओकॉन प्रकरणात चंदा कोचर दोषी, बँकेच्या अंतर्गत चौकशीचा निष्कर्ष
Just Now!
X