08 March 2021

News Flash

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

संध्याकाळी ७ वाजता करण्यात आलं दाखल

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना रुटीन चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. डी. एस. राणा यांनी सांगितलं आहे. आज संध्याकाळी सात वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

काही वेळापूर्वीच सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या राज्यसभा खासदारांसोबत बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच या बैठकीत करोना, भारत-चीन यांच्यातले तणावपूर्ण संबंध, सध्याची राजकीय स्थिती या सगळ्या विषयांवर चर्चा झाली.

दरम्यान ही बैठक झाल्यानंतर काही वेळाने म्हणजेच संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना रुटीन चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं डॉ. डी. एस. राणा यांनी स्पष्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 8:22 pm

Web Title: congress president sonia gandhi admitted today at 7 pm to sir ganga ram hospital scj 81
टॅग : Congress
Next Stories
1 ४ किलो सोनं, ६१० किलो चांदी, ११ टीव्ही, १० फ्रिज; जयललितांची मालमत्ता ताब्यात
2 करोना संकटात दिलासा! भारताचा रिकव्हरी रेट ७.८५ वरुन ६४.४ टक्क्यांवर
3 करोनावर मात करण्यासाठी हर्ड इम्युनिटी पर्याय नाही, केंद्राने केलं स्पष्ट
Just Now!
X