News Flash

“गैर भाजपा शासित राज्यांवर केंद्राचा अन्याय”; सोनिया गांधींची घणाघाती टीका

काँग्रेस वर्किंग कमिटीत सोनिया गाधींचा भाजपावर निशाणा

संग्रहीत

करोनामुळे देशाची स्थिती बिघडल्यानंतर काँग्रेसनं केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसनं वर्कींग कमिटीची बैठक बोलावली होती. यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. गैर भाजपा शासित राज्यांवर केंद्र सरकार अन्याय करत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी यावेळी केला. केंद्राकडून भाजपा शासित राज्यांना प्राथमिकता दिली जात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तर करोना संदर्भातील उपाययोजनावरही त्यांनी आक्षेप घेतला.

“काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांनी वारंवार करोनासंदर्भातील उपाययोजनासाठी केंद्राकडे मदत मागत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आवश्यक बाबींची पूर्तता करण्यास सांगत आहेत. मात्र केंद्र सरकार यावर कोणतंही पाऊल उचलताना दिसत नाही. काही राज्यांमध्ये लसींचा तुटवडा आहे, व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजन संपलंय. या बाबी वारंवार सांगूनही भाजपाशासित राज्यांना प्राधान्य दिलं जात आहे.”, असा टीकेचा सूर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बैठकीत लावला.

“…त्याचप्रमाणे कोविड मृत्यू प्रमाणपत्रावरही नरेंद्र मोदींचा फोटो हवा”

करोना लसींच्या निर्यातीवरही या बैठकीत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. दूसऱ्या देशांना मदत करण्याच्या नादात आपल्याच देशात लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. हजारो लोक रोज मरताहेत. मात्र सरकार मूग गिळून गप्प बसल्याची टीकाही सोनिया गांधी यांनी यावेळी केली. तर रेमडेसिवीर, ऑक्सिजन यासारख्या वस्तूंवर १२ टक्के जीएसटी का घेतला जात आहे?. तसेच करोनाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक वस्तू असलेल्या ऑक्सिमीटर आणि व्हेंटिलेटरवर २० टक्के जीएसटी का? असा प्रश्नही सोनिया गांधी यांनी बैठकीत उपस्थित केला.

“उद्धव ठाकरेंनी निर्लज्ज राजकारण थांबवावं”, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मुख्यमंत्र्यांवर परखड टीका!

करोना संबंधित आवश्यक वस्तुंना जीएससीटी करातून मुक्त ठेवण्याची प्रमुख मागणी या बैठकीत करण्यात आली. तसेच २५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील नागरिकांनाही लस देण्यात यावी, यावर बैठकीत एकमत झालं. त्याचबरोबर गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या प्रत्येक नागरिकाला लस देणं आवश्यक असल्याचं मतही मांडण्यात आलं. करोनामुळे गरीब नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यांना केंद्र सरकारने आर्थिक मदत करण्याचं आवाहनही बैठकीत करण्यात आलं. लॉकडाऊन प्रभावित नागरिकांना ६-६ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर प्रवासी मजुरांसाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 6:05 pm

Web Title: congress president sonia gandhi blame on central government not support to non bjp government state rmt 84
टॅग : Bjp,Congress
Next Stories
1 “उद्धव ठाकरेंनी निर्लज्ज राजकारण थांबवावं”, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मुख्यमंत्र्यांवर परखड टीका!
2 उत्तर प्रदेशात विना मास्क कायदा शिकवण्याऱ्या पोलिसाला नागरिकांचा हिसका
3 चारा घोटाळ्यातील आरोपी लालू प्रसाद यादव यांना अखेर जामीन
Just Now!
X