दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बुधवारी राष्ट्रपती भवनात जाऊन रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांनी यावेळी राष्ट्रपतींना एक पत्रक सोपवले. लोकांचे आयुष्य, स्वातंत्र्य आणि संपत्ती सुरक्षित राहिली पाहिजे.

दिल्लीतील हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या गृहमंत्र्यांना तात्काळ पदावरुन हटवा अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली. दिल्लीत हिंसाचार सुरु असताना, केंद्र आणि राज्य सरकार मूक साक्षीदार बनून राहिल्याचा आरोप त्यांनी केला.

आणखी वाचा – दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे अद्याप गप्पच : ओवेसी

मनमोहन सिंह म्हणाले…
मागच्या चार दिवसात दिल्लीमध्ये जे घडले, तो गंभीर चिंतेचा विषय आहे. देशासाठी लाजिरवाणी बाब आहे. यामध्ये ३४ जणांचा मृत्यू झाला असून, २०० जण जखमी झाले आहेत. हे पूर्णपणे केंद्र सरकारचे अपयश आहे असे मनमोहन सिंग म्हणाले.