News Flash

सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस खासदारांची उद्या बैठक; करोना स्थितीवर करणार चर्चा

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार संवाद

करोनामुळे देशातील स्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जात असल्याचं दिसत आहे. रोजच करोना रुग्णांचा आकडा नकोसा विक्रम प्रस्थापित करत आहे. त्यामुळे केंद्र सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर विरोधकांनी टीका केली आहे. करोना स्थिती हातळण्यास केंद्रातील मोदी सरकार अपयशी ठरल्याचं टीकास्त्र विरोधकांनी सोडलं आहे. देशातील करोनाची विदारक स्थिती पाहता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेस खासदारांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत करोनास्थितीबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

यापूर्वी काँग्रेस वर्कींग कमिटीच्या बैठकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. गैर भाजपा शासित राज्यांवर केंद्र सरकार अन्याय करत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी यावेळी केला होता. केंद्राकडून भाजपा शासित राज्यांना प्राथमिकता दिली जात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं.

“महाराष्ट्र मॉडेलचा वापर करा, अन्यथा देशातील करोना नियंत्रणात येणार नाही”

भारतात दोन लस उत्पादक कंपन्यांनी करोना प्रतिबंधक लशींसाठी वेगवेगळ्या किमती जाहीर केल्या आहेत. मात्र सरकार केवळ मूकदर्शक बनले. लस उत्पादकांच्या नफेखोरीला पाठबळ देणाऱ्या केंद्र सरकारचे लसीकरण धोरणच भेदभावजनक आणि असंवेदनशील आहे, अशी टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यापूर्वी केली आहे.

‘निवडणुका संपल्या, पुन्हा लूट सुरू’; काँग्रेस नेते राहुल गांधींचं टीकास्त्र

गेल्या २४ तासात ४ लाख १२ हजार ६१८ जणांना करोनाची लागण झाली आहे. दुसऱ्यांदा देशात करोना रुग्णांचा आकडा ४ लाखांच्या पार गेला आहे.यापूर्वी ३० एप्रिलला देशात करोनाची बाधा ४ लाख २ हजार ३५१ जणांना झाली होती. बुधवारी एका दिवसात ३ हजार ९८० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३ लाख २९ हजार ११३ जणांनी करोनावर मात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 12:00 pm

Web Title: congress president sonia gandhi hold a meeting via video conference with the party mp tomorrow rmt 84
टॅग : Congress,Corona
Next Stories
1 आसाराम बापूला करोनाची लागण, आयसीयूत केलं दाखल
2 फायझर-बायोएनटेक लसीचा शुक्राणूंवर कोणताही परिणाम नाही!
3 पश्चिम बंगाल हिंसाचार: चौकशीसाठी गृहमंत्रालयाकडून चार सदस्यांच्या पथकाची नेमणूक
Just Now!
X