पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ढग आणि रडारच्या विधानापासून ते खासदार सत्यपाल सिंग यांच्या डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतापर्यंत भाजपा नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. गाजलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर काँग्रेसने डिजिटल स्वरूपात बंच ऑफ थॉट्स असा व्हिडीओ तयार केला आहे. “ज्यावेळी देशाचे नेते तर्कशास्त्र नाकारतात, त्यावेळी आपल्या सर्वांना याची भीती वाटली पाहिजे,” असे मतही काँग्रेसने व्यक्त केले आहे.

मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसने सोशल मीडियातूनही आक्रमक झाली आहे. भाजपा नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या अतार्किक वक्तव्यांवरून काँग्रेसने भाजपावर व्यंगात्मक टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अर्थमंत्री निर्मला सीतारामण, रेल्वेमंत्री पियूष गोयल, सत्यपाल सिंग, त्रिवेंद्र सिंग, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, सुशीलकुमार मोदी आदीं नेत्यांनी केलेल्या विधानांवर काँग्रेसने व्हिडीओ स्वरूपात पुस्तक तयार केले आहे.

या व्हिडीओला ‘बंच ऑफ थॉट्स : बीजेपी एडिशन’ असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे “ज्यावेळी देशाचे नेते तर्कशास्त्र नाकारतात, त्यावेळी आपल्या सर्वांना याची भीती वाटली पाहिजे,” असे मत काँग्रेसने व्यक्त केले आहे. पर्यावरण बदलांवर बोलताना मोदी यांनी “पर्यावरण बदलले नाही, तर आपण बदललो आहोत,” असे विधान केले होते. त्यानंतर एअर स्ट्राईकविषयी मोदी म्हणाले होते, “मी म्हणाले ढग आहेत. पाऊस होतोय. तर यात एक फायदा आहे. आपण रडारपासून लपू शकतो,” असे विधान मोदी यांनी केले होते.

व्हिडीओ पाहा-

वाहनांची विक्री घसरल्यानंतर एका कार्यक्रमात निर्मला सीतारामण म्हणाल्या होत्या, “भारतीय तरूणांची मानसिकता ओला, उबर वापरण्याची आहे. त्यामुळे वाहनांची विक्री घसरली आहे.” यासह रेल्वेमंत्री पियूष गोयल, सत्यपाल सिंग, त्रिवेंद्र सिंग, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, सुशीलकुमार मोदी आदीं नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचा समावेश या व्हिडीओत केलेला आहे.