News Flash

“भारताला त्यांच्यासारख्या पंतप्रधानाची…,” राहुल गांधींकडून मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मनमोहन सिंग यांचा आज ८८ वा वाढदिवस

संग्रहित (PTI)

माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांचा आज ८८ वा वाढदिवस आहे. २००४ ते २०१४ या कार्यकाळात मनमोहन सिंग देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होते. मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. देशाला त्यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवत असल्याचं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

“भारताला मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवत आहे. त्यांचा प्रामाणिकपणा, सभ्यता आणि समर्पण आम्हा सर्वांसाठी प्रेरणा आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा,” असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणाले…

यासोबतच मनमोहन सिंग यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. मनमोहन सिंग यांचा जन्म भारताच्या फाळणीआधी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात २६ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. २००४ मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी मनमोहन सिंग १९९८ ते २००४ पर्यंत राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदी होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 9:28 am

Web Title: congress rahul gandhi happy birthday wishes to former pm dr manmohan singh sgy 87
Next Stories
1 सीबीआय तपासावर सुशांतचं कुटुंब नाराज; वकील विकास सिंह यांचा दावा
2 आरोप करणाऱ्या पाकिस्तानला भारतानं सुनावलं; POK वरील अवैध ताबा सोडा
3 UN मध्ये भाषणादरम्यान इम्रान खान यांचे आरोप; भारतानं केलं बॉयकॉट
Just Now!
X