भारतात करोनाने थैमान घातलं असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी मोदी सरकार परिस्थिती योग्य रितीने हाताळत नसल्याची टीका वारंवार करत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी करोना, चीन तसंच इतर मुद्द्यांवरुन चीनवर निशाणा साधत असतात. दरम्यान राहुल गांधींनी करोना रुग्णांसंबंधी केलेला एका दावा खरा ठरला आहे. तीन दिवस आधीच तो दावा खरा ठरला असल्याने राहुल गांधीचं ते ट्विट सध्या चर्चेत आहे.

काय होता दावा –
राहुल गांधी यांनी १७ जुलै रोजी एक ट्विट करत १० ऑगस्टपूर्वी देशातील करोनाबाधितांची संख्या २० लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली होती. यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करायला हव्या असंही त्यांनी म्हटलं होतं.

आणखी वाचा- विस्फोटक वाढ! फक्त नऊ दिवसांत पाच लाख रुग्णांची भर; असा ओलांडला २० लाखांचा टप्पा

महत्त्वाचं म्हणजे भारतातील करोनाबाधित रुग्णसंख्येने १० ऑगस्टच्या आधीच २० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. भारतात आता करोनाग्रस्तांची संख्या २० लाख ६ हजार ७६० इतकी झाली आहे. भारतातील रुग्णसंख्या २० लाखांच्या पुढे गेल्यानंतर राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी “करोनाबाधितांच्या संख्येनं २० लाखांचा टप्पा पार केला आहे. परंतु मोदी सरकार गायब आहे,” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा- मोठी बातमी… पहिल्यांदाच एका दिवसातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ६० हजारांच्या पुढे

आणखी वाचा- करोनाबाधितांची संख्या २० लाखांच्या पार पण…; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

करोनाबाधित देशांच्या यादीत भारताचा क्रमांक तिसरा आहे. अमेरिकेत करोनाबाधित रुग्णांची संख्या ५० लाखांपेक्षा जास्त असून ब्राझिलमध्ये २८ लाखांपेक्षा जास्त तर भारतात २० लाखांपेक्षा जास्त झाली आहे.